गडहिंग्लज-चंदगडला वळवाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:13+5:302021-04-27T04:26:13+5:30

गडहिंग्लज व चंदगड शहरासह तालुक्यात वळीव पावसाने दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला ...

Gadhinglaj-Chandgadla diversion | गडहिंग्लज-चंदगडला वळवाचा दणका

गडहिंग्लज-चंदगडला वळवाचा दणका

गडहिंग्लज व चंदगड शहरासह तालुक्यात वळीव पावसाने दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

चंदगड तालुक्यातील शिरगांव, हिंडगाव, फाटकवाडी, आसगाव, सुळये, नागवे या परिसरात पावसाने हजेरी लावली. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील र. भा. माडखोलकर महाविद्यालयासमोर जुनाट वृक्ष कोसळून पडल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली.

वळीव पावसाने ऊसपिकांना फायदा झाला आहे, तर मका व भुईसपाट झाला आहे.

--------------------------

*

फोटो ओळी : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयासमोर जोरदार वाऱ्यासमुळे जुनाट वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

क्रमांक : २६०४२०२१-गड-०९

----------------------

* गडहिंग्लज शहर व तालुक्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाने तासभर झोडपून काढले. त्यामुळे ऊस पिकाच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : २६०४२०२१-गड-१०

Web Title: Gadhinglaj-Chandgadla diversion