कोकण आणि कोल्हापूरच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या १०८ किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण सन २०१६ मध्ये पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल रेल्वे महामंडळाला सादर झाला. त्या वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ३४३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कायम ठेवण्यात आला आहे. त्यासह या मार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येयही निश्चित करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती रेल्वे विभागाने ‘व्हिजन २०२४’च्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान, या मार्गाच्या कामाचा निधी अर्थसंकल्पामध्ये कायम ठेवला आहे. आता लवकरात लवकर मार्गाचे काम सुरू करून कोकणवासीय आणि कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी प्रतिक्रिया पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी मंगळवारी व्यक्त केली.
अर्थसंकल्पात ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचा निधी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST
कोकण आणि कोल्हापूरच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या १०८ किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण ...
अर्थसंकल्पात ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचा निधी कायम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}