शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST

कोल्हापूर : काही खाद्यपदार्थ विक्रेते वडे, भजी, पुऱ्या, सामोसे, कचोरी, वा अन्य पदार्थ वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करून करतात. ...

कोल्हापूर : काही खाद्यपदार्थ विक्रेते वडे, भजी, पुऱ्या, सामोसे, कचोरी, वा अन्य पदार्थ वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करून करतात. हेच पदार्थ आपण आवडीने खातो. अशा वारंवार तळलेल्या तेलातील पदार्थ खाल्ल्यामुळे घसा दुखणे, पोटाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोगासारखे रोगही बळावू शकतात. असा निष्कर्ष एका सर्वेक्षणात समोर आला आहे. त्यापेक्षा असे तेल अन्य कामात उपयोगात आणावे, असा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

एकच प्रकारचे तेल वारंवार वापरले तर त्यात पाॅलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कम्पाउंडचे प्रमाण वाढते. ते प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको. नाही तर तपासणीत असे तेल आढळले तर त्या विक्रेत्यावर दंडात्मक व गुन्ह्याचे स्वरूप मोठे असेल तर तुरुंगवासही होऊ शकतो. अशा तेलात नवीन तेल ओतून ते पुन्हा वापरले जाते.

तेलाच पुनर्वापर आरोग्याला घातक

भजी, वडे, सामोसे, पुऱ्या असे अनेक पदार्थ तेलात तळून विकले जातात. अशा तेलातील पदार्थ खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवितात. वारंवार वापरलेल्या पदार्थापासून हृदयाला व मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञही असे तेल वापरू नका, असा सल्ला देत आहेत.

रस्त्यावरचे पदार्थ न खाल्लेलेच बरे

रस्त्यावरच्या पदार्थांकरिता वारंवार तळलेले तेल वापरले जाते. त्यात पोलर कम्पाउंडचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे घसा, पोट, मूत्रपिंड किंबहुना कर्करोगालाही आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे असे पदार्थ न खाल्लेलेच बरे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

...तर होईल गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासन खात्यानेही अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार तळलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्यास त्या तेलाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने घेण्यास सुरुवात केली आहे. या तेलात पोलर कम्पाउंडचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातात. अहवालानंतर त्या विक्रेता, हाॅटेलवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून गंभीर असेल तर गुन्हा दाखल केला जातो. अशा गुन्ह्यात दोषी आढळल्यास तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

- टी.यू. शिंगाडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (अन्न)

घरचे अन्न कायम चांगलेच

वडे, भजी, पुऱ्या, सामोसे, कचोरी असे पदार्थ घरातील तेलात एकदाच तळून खाल्ले तर त्यापासून आरोग्यास धोका उद्भवत नाही. तळण्याची व तेल वापरण्याची प्रक्रिया आपण स्वत: किंवा घरातील मंडळी डोळ्यासमोर करतात. त्यामुळे असे पदार्थ खात्रीशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडेच घ्यावेत.

- डाॅ. शरद पोवार, एम.डी.

केवळ एकाच खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई

कोल्हापुरात अनेक खाद्य पदार्थ विक्रेते आहेत. त्यातील अनेक जणांच्या तेलाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात आहे. त्यापैकी एका साखळी खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे असे वारंवार तळलेले तेल आढळले. त्याचा पोलर कम्पाउंड २५ टक्क्यांपेक्षा अधिक होता. त्यामुळे त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर त्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे.

कारवाई का होत नाही?

अनेक वडे, भजी, सामाेसा, कचोरी विक्रेते अशा वारंवार तळलेल्या तेलाचा वापर सर्रास करतात. तो करीत असताना नवीन तेल त्यात मिसळले जाते. त्यामुळे पोलर कम्पाउंड २५ टक्क्यांपेक्षा कमी होतो. त्यामुळे कारवाई करताना तपासणीत ते तेल तळण्यायोग्य असेच दिसते. याला टाॅपअप असेही म्हटले जाते. तरीही अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी चांगले तेल वापरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.