शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

फिरस्त्या सहा मुलांची शोषणातून मुक्तता

By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST

पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : १७ महिला, पुरुषांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोल्हापूर : शहरात विविध ठिकाणी लहान मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या फिरस्त्या महिला, पुरुषांवर मंगळवारी दुपारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताब्यातून सहा मुलांची मुक्तता केली. पीडित मुलांची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख वैष्णवी पाटील यांनी पत्रकारांना दिली. लहान मुलांना भीक मागण्यास काही फिरस्त्या महिला व पुरुष सक्ती करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून मुलांची सुटका करण्याची मागणी संयुक्त विद्यार्थी संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे मंगळवारी केली. यावेळी डॉ. शर्मा यांनी तुमच्यासोबत पोलीस पाठवून देतो, संबंधितांवर कारवाई होईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार वैष्णवी पाटील, विद्या जाधव यांच्यासह पोलिसांच्या चार पथकांनी अंबाबाई मंदिर परिसर, उमा टॉकीज, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, ताराराणी चौकात शोध घेतला. यावेळी १७ फिरस्त्या महिला व दोन पुरुष व त्यांच्यासोबत सात मुले आढळली. यावेळी पळून जाणाऱ्या महिला व मुलांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले. मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली. ही कारवाई संयुक्त विद्यार्थी संषर्घ समितीचे पदाधिकारी रोहित पाटील, श्वेता परुळेकर, श्रीधर पाटील, अवधूत अपराध, भारत घोडके, मंदार पाटील, संदीप देसाई, नीलेश यादव, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी) कामाच्या नावाखाली भीक पोलिसांनी महिलांकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही राजस्थानचे रहिवासी असून, गांधीनगर येथे राहतो. आम्ही रस्त्यावर फिरून विकत असल्याचे सांगितले. आम्ही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गांधीनगरमधून सकाळी कोल्हापुरात येतो, दिवसभर विविध चौकांत, गर्दीच्या ठिकाणी जाऊन भीक मागतो, रात्री घरी जाताना दाभोळकर कॉर्नर येथे एकत्र येऊन मिळालेला पैसा आई-वडिलांना देत असल्याचे या मुलांनी सांगितले.