शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीची चार वर्षांपासून केवळ चर्चाच

By admin | Updated: September 7, 2015 22:25 IST

आजरा ग्रामपंचायत : ‘नगरसेवक’ होण्याची स्वप्ने पडू लागल्याने इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणार अशी गेली चार वर्षे सुरू असलेली चर्चा आजही कायम आहे. नगरपंचायत होणार अशी चर्चा जरी असली, तरी अनेकांना आपण ‘नगरसेवक’ होणार अशी स्वप्ने पडू लागल्याने आपल्याशिवाय (?) शहराचा विकास होऊच शकत नाही, असे गृहीत धरून गुडघ्याला बाशिंग बांधून अशी मंडळी तयार आहेत.तीन वर्षांपूर्वी आजरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. यावेळी वर्षभरात ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार, अशी चर्चा जोरात होती. तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने हेच कारण पुढे करून बिनविरोधचे प्रयत्न झाले, परंतु निवडून येण्याची क्षमता असणारी मंडळी बिनविरोधच्या प्रयत्नात डावलले जाणार असल्याचा अंदाज आल्याने थेट निवडणूक रिंगणात उतरली व यापैकी बरीचशी निवडूनही आली.नगरपंचायतीची टांगती तलवार असल्याने सरपंचपदाची संधी आपणालाच प्रथम मिळावी यासाठी सुरू असलेली स्पर्धा आजही कायम आहे. दरम्यान, या स्पर्धेमुळेच तीन वर्षांत चार महिला सरपंच झाल्या. अद्यापही नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडून आहे. प्रस्ताव पुढे रेटण्यास राजकीय उदासीनता कारणीभूत ठरत आहे.सद्य:स्थितीत ग्रामपंचायतीचा कालावधी जसजसा संपत चालला आहे, तसतशी पुन्हा नगरपंचायतीची चर्चा सुरू झाली आहे. नगरसेवक बनण्यासाठी अनेकांनी ‘पेरणीही’ सुरू केली आहे, तर बरेचजण आपण नगरसेवकच नव्हे तर पहिले ‘नगराध्यक्ष’ होणार, अशा बढायाही मारू लागले आहेत.साहेब.. नगरपंचायतीचे काम झाले ?आजरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर यांच्याकडेही इच्छुकांकडून वारंवार साहेब नगरपंचायतीचे काय झाले? अशी विचारणा होते, पण या प्रश्नाचे उत्तर तूर्तास त्यांच्याकडेही नाही.