शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

माद्याळातील धूमधडाक्यात लग्नप्रकरणी वधू-वर पित्यासह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

माद्याळ, ता. कागल येथील प्रकाश बंडू भिऊगडे यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्ने गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील जोतिबा श्रीपती नलगे ...

माद्याळ, ता. कागल येथील प्रकाश बंडू भिऊगडे यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्ने गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील जोतिबा श्रीपती नलगे यांच्या दोन्ही मुलींशी ठरवली होती. दरम्यान, संपूर्ण राज्यात १४४ कलम लागू केल्याने लग्न समारंभासाठी ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन पंचवीस लोकांच्या उपस्थित लग्न पार पाडणे गरजेचे होते.

तथापि, भिऊगडे यांनी कोणतीच परवानगी न घेता पंचवीसपेक्षा जास्त लोकांना एकत्रित करून लग्न समारंभ करण्यास सुरुवात केली होती. याबाबत माद्याळमध्ये धूमधडाक्यात लग्न सुरू आहे असा निनावी फोन मुरगूड पोलिसांना आला. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, स्वप्निल मोरे, पोलीस सुदर्शन पाटील, ग्रामसेवक कुंभार, पोलीस पाटील मदन संकपाळ, आदींनी माद्याळमध्ये जाऊन ग्रामपंचायत प्रशासनाला बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसल्याने पोलिसांनी वर पिता प्रकाश बंडू भिऊगडे, रा माद्याळ, वधू पिता जोतिबा श्रीपती नलगे, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज, लग्न कार्यात सहकार्य करणारे शरद महादेव भिऊगडे, रा. कडगाव व आनंदा मारुती नागरे, रा. हनीमनाळ, ता गडहिंग्लज या चौघांवर गुन्हा नोंद केला. याबाबत ग्रामपंचायत शिपाई बबन बाळासो गरड यांनी फिर्याद दिली.