नियमांचे पालन हाच प्रभावी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST2021-04-23T04:24:59+5:302021-04-23T04:24:59+5:30

संदीप बावचे : जयसिंगपूर : कोरोनाचे दुसरे संकट वाढू लागले आहे. या संकटकाळात कोरोना योध्दा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, ...

Following the rules is the only effective solution | नियमांचे पालन हाच प्रभावी उपाय

नियमांचे पालन हाच प्रभावी उपाय

संदीप बावचे :

जयसिंगपूर : कोरोनाचे दुसरे संकट वाढू लागले आहे. या संकटकाळात कोरोना योध्दा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस लढा देत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव आता वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत शिरोळ तालुक्यात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. तालुक्यात अडीचशे कोविड रुग्ण आहेत. सध्या तरी आरोग्य यंत्रणा सक्षम असली तरी, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन हाच उपाय प्रभावी ठरणार आहे.

जिल्ह्याबरोबर शिरोळ तालुक्यातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, सात प्राथमिक, ३३ उपकेंद्रे व दोन आयुर्वेदिक दवाखाने आहेत. दत्तवाड व शिरोळ ग्रामीण रुग्णालयात स्वॅब संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर शंभर बेडचे कोविड सेंटर उदगाव कुंजवन येथे सुरू आहे. याठिकाणी ५४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी कोविड केंद्रे सुरू झाली आहेत.

शासकीय पातळीवर ग्राम समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उपलब्ध होणाऱ्या लसी, त्यातून ४५ वयोगटापुढील लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद चांगला आहे. तालुक्यात ४५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता दैनंदिन ३५ ते ४० रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन ही जबाबदारी सर्वांचीच बनली आहे.

चौकट -

व्यावसायिकांची कोविड तपासणी

उद्योगाबरोबरच व्यावसायिकांनाही कोविड तपासणी करून घेण्याबाबतच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याशिवाय दुकाने सुरू करू नयेत, असे आदेश देण्यात आले असले तरी, यावर नियंत्रण कोणाचे, ही बाब देखील पुढे आली आहे. त्यामुळे नगरपालिका व ग्रामपंचायतींनी जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट:

आरोग्य यंत्रणेचा आधार

मागील वर्षापासून आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत हीच आरोग्य यंत्रणा सक्षम ठरली होती. त्यामुळे या संकटकाळात कोरोना योध्दा म्हणून काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे नियमांचे पालन गरजेचे ठरणार आहे.

Web Title: Following the rules is the only effective solution