शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

भडकल्या ज्वाला - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

अशा या दुनियेत आम्हाला आमच्या आईपासून दूर करून आम्हा मायलेकरांची ताटातूट होईल. तिचा दहन विधीसुद्धा पूर्ण करायला मिळणार नाही ...

अशा या दुनियेत आम्हाला आमच्या आईपासून दूर करून आम्हा मायलेकरांची ताटातूट होईल. तिचा दहन विधीसुद्धा पूर्ण करायला मिळणार नाही ही समयसूचकता ओळखून दोघा भावांनी दु:खी अंत:करणाने आपल्या आईचे प्रेत गावी घरी आणले.

आईचे प्रेत पाहून सुवर्णाने हंबरडा फोडला. आईच्या प्रेतावर पडून तिची ओवी गात रडून आक्रोश करू लागली. तिचा तो आक्रोश पाहून प्रेताला आलेल्या लोकांच्या नेत्रात अश्रू दाटून आले. शेवंतीला सौभाग्याचं मरण आलं होतं. साऱ्या सुवासिनींनी मिळून तिला अंघोळ घातली. माहेरची साडी नेसवली. तिचा मळवट भरून ओटी भरली. सर्व विधी झाला आणि माणसांनी शेवंतीचे प्रेत तिडकीवर बांधले. पांडुरंगाने शिकाळी धरली. प्रेत उचलले आणि सुवर्णाने ‘बोंब’ ठोकून आक्रोश केला. बायकांनी तिला सावरले. बायकांनी प्रेतामागे हळदी - कुंकवाच्या पाण्याचा सडा टाकला आणि प्रेत स्मशानात चितेवर ठेवले आणि पांडबाने हातात दिवटी घेऊन चितेला अग्नी दिला. तसे दोघे भाऊ गळ्याला पडून रडू लागले. चितेचा अग्नी भडकला. त्यात शेवंतीचा देह जळत होता. त्या जळत्या देहाकडे पाहून विश्वास रडतच म्हणाला, आई... तुझी आठवण येते गं... तुला कोरोना रोग नव्हता. कोणता आजार नव्हता. येवढी धडपड, प्रयत्न करूनही माते तू वाचली नाहीस, याचे दु:ख वाटते. प्रयत्न करूनही तुला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकलो नाही. हे आमचं दुर्दैव आहे. चितेच्या भडकत्या अग्नीत शेवंतीचा देह जळत होता. दोघा भावांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. दोघांचा आत्मा पेटला होता; पण आता त्यांचा नेत्रातील अश्रूशिवाय काय उपाय नव्हता. त्या चितेवर जळत्या देहाकडे पाहून आईची तीव्रतेने स्मृती जागृत झाली.

माते हृदयात येते दु:ख भरून

कशी अचानक गेलीस वनात सोडून

का दूर गेलीस आम्हा अनाथ करून

होती तुझी माया आभाळ भरून

आम्हासाठी माते कष्टविलेस तू जीवन

दिलीस तू जीवनभराची शिदोरी बांधून

तुझ्या मातृत्वाने दिला आदर्श घडवून

माते पिलांचे घायाळ झाले मन

तुझ्या मृत्यूने हृदयात घुसला बाण

माते तुझी काळजी बोलते जळत्या अग्नीतून

लेकरांनी या निर्दयी जगात कसं जगाल तरून

जगणार माते तुझ्या पंखांचा आधार घेऊन

अशाप्रकारे भडकल्या अग्नीच्या ज्वालांत शेवंतीच्या आयुष्याचा शेवट झाला.

- विष्णू रामू वासुदेव,

सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर, बिडी कॉलनी, कोल्हापूर.