शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

‘मनपा’चे पाच स्वीकृत सदस्य मतदानास मुकणार

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

स्वीकृत सदस्यांबाबत...-विधान परिषद निवडणूक

कोल्हापूर : महापालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रियाच सुरू न झाल्याने विधान परिषद निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. आचारसंहितेमध्ये नवी निवड करता येत नसल्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रियाही लांबू शकते. महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरच्या प्रारंभी झाली. त्यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया चुरशीची झाल्याने स्वीकृत सदस्य निवडीकडे दुर्लक्ष झाले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्वीकृत सदस्य निवडीपूर्वी सभागृहाचे गटनेते निश्चित होण्याची गरज असते. कारण हे गटनेते स्वीकृत सदस्यांची नावे महापालिका आयुक्तांना लेखी देतात व आयुक्त सर्वसाधारण सभेत त्याची घोषणा करतात. गट नेत्यांच्या निवडीला अजून विभागीय आयुक्तांनी रीतसर मान्यता दिलेली नाही. तोपर्यंत आचारसंहिता लागू झाल्याने स्वीकृत सदस्यांची निवड करण्यावरही बंधने आली. महापालिकेची सभा बोलविण्यासाठी किमान दहा दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. तोपर्यंत जिल्हा निवडणूक शाखेतर्फे आज, शुक्रवारी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवड होणे व त्यांचा मतदारयादीत समावेश होण्याचा मार्गच बंद झाला आहे.महापालिकेतील सरासरी १६ सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य घेता येतो. त्या हिशोबाने काँग्रेस व भाजप-ताराराणी आघाडीस प्रत्येकी दोन व राष्ट्रवादीला एक असे पाच सदस्य स्वीकृत घेता येतात. स्वीकृत सदस्य निवडणारेच विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत धावत असल्याने या निवडीकडे दुर्लक्ष झाले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आम्ही आज, शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणार आहोत; परंतु मनपाकडून स्वीकृत सदस्यांची नावे प्राप्त झालेली नाहीत. शिवाय आचारसंहितेमुळे नवीन निवड करता येणार नसल्यामुळे या पाच सदस्यांचा मतदार यादीत समावेश होण्याची शक्यता नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.