शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील बस वाहतुक पुर्ववत, पहिल्या टप्प्यात सात बसेस सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:43 IST

state transport Kolhapur Belgon- सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एस.टी.महामंडळाची महाराष्ट्र -कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ही बससेवा गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यात सात बसेस बेळगावकडे सोडण्यात आल्या. तर आज, शुक्रवारपासून ही सेवा पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.

ठळक मुद्देसीमा भागातील बस वाहतुक पुर्ववत पहिल्या टप्प्यात सात बसेस सुरु : पुर्ण क्षमतेने वाहतुक सुरु

कोल्हापूर : सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एस.टी.महामंडळाची महाराष्ट्र -कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ही बससेवा गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यात सात बसेस बेळगावकडे सोडण्यात आल्या. तर आज, शुक्रवारपासून ही सेवा पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.सीमा भागात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या बेळगाव जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसवर स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली. त्यांनंतर सीमावाद पुन्हा उफाळला.

शनिवारी (दि.१३) कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर- स्वारगेट(पुणे)या मार्गावर धावणारी एस.टी.बस फलाटवर उभी होती. त्यावर एका कन्नडीगाने दगडफेक केली. त्यामुळे शनिवारपासून कोल्हापूर बेळगावकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या. या मार्गावर १५ बसेसद्वारे ८० फेऱ्या या मार्गावर होत असत. मात्र, त्या सहा दिवसांपासून बंद झाल्यामुळे सुमारे ४२ लाखांचे नुकसान झाले आहे.

याशिवाय हजारो प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्विकारावा लागला. त्यातून अनेकांच्या खिशाला अर्थिक चाट लागला तो वेगळाच. त्यामुळे ही सेवा पुर्ववत होणे सीमाभागातील प्रवाशांकरीता गरजेचे होते. सेवा सुरु झाल्याबद्दल या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.स्थानकासह परिसरातील व्यवसायवर परिणामगेले काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे कोल्हापूरातून सातारा, पुणे, औरंगाबाद,नागपूर, मुंबई या शहरांमध्ये जाणाऱ्या बसेसवर परिणाम झाला आहे. या जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या भाविक प्रवाशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासह परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व अन्य व्यवसायवर परिणाम झाला आहे. त्यात गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूरातून कर्नाटककडे जाणाऱ्या राज्य शासनाच्या एस.टी.बसेसची सेवाही बंद झाल्यामुळे या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. आता शुक्रवारपासून ही सेवा पुर्ववत होणार असल्यामुळे या विक्रेत्यांनाही काही अशी दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव