दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून हाणामारी

By Admin | Updated: October 31, 2016 00:06 IST2016-10-31T00:06:53+5:302016-10-31T00:06:53+5:30

शिवाजी पेठेतील प्रकार : कार्यकर्ते माजी नगरसेवकांचे

The firing on the wishes of Diwali | दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून हाणामारी

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून हाणामारी

कोल्हापूर : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून दोघा माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने गोंधळ उडून तणाव पसरला. अखेर परिसरातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करीत प्रकरणावर पडदा टाकल्याने हा वाद जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत गेला नाही.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खरी कॉर्नर परिसरातील एका माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते शिवाजी पेठेत गेले. शुभेच्छा देत असताना येथील माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही आमच्या परिसरात का आला?’ असे म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार खरी कॉर्नर येथील माजी नगरसेवकाला समजला. त्यांचेही कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर शिवाजी पेठेतील काही कार्यकर्ते खरी कॉर्नर परिसरात आल्यानंतर दोन्ही माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना खरी कॉर्नर परिसरात हाणामारीने गोंधळ उडून तणाव पसरला. ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशीच कार्यकर्त्यांनी हाणामारीनेच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या प्रकाराची शहरात दिवसभर जोरदार चर्चा होती. परिसरातील ज्येष्ठांनी तडजोडीने वाद मिटविल्याने या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. (प्रतिनिधी)
 

Web Title: The firing on the wishes of Diwali