शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मतदार यादीचा घोळ संपला!

By admin | Updated: October 14, 2015 01:07 IST

४ लाख ५३ हजार २१० मतदारांचा समावेश

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या मतदार यादीचा घोळ अखेर मंगळवारी संपला. अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रारूप आणि अंतिम मतदार याद्यांत सुमारे ४४ हजार मतदारांच्या नोंदी दुरुस्त करताना महापालिका प्रशासनाच्या नाकी दम आला. अंतिम मतदार यादीनुसार शहरातील ८१ प्रभागांत एकूण ४ लाख ५३ हजार २१० मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २ लाख २९ हजार ५१८ पुरुष मतदारांचा, तर २ लाख २३ हजार ६९२ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले की, चाळीस हजार मतदारांची नावे एक प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली होती. निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमुळे ही चूक झाली होती; परंतु ती आमच्या यंत्रणेने शोधून काढली होती. ती दुरुस्त करून ज्या-त्या प्रभागात मतदारांची नावे नोंदविली; परंतु अंतिम मतदार यादीतही सुमारे ४२३९ मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली होती. त्यांची दुरुस्त करण्यात आली. एकूण मतदारांपैकी ४२४४ मतदारांची नावे विधानसभेच्या यादीत होती; परंतु महापालिका निवडणुकीच्या यादीत नावे नसल्याचे आढळून आले होते. त्याबाबत संबंधित मतदारांकडून पुरावे घेऊन नावांची नोंद करण्यात आली.कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ::दि. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिले प्रशिक्षण १८ आॅक्टोबरला, तर दुसरे २५ आॅक्टोबरला विवेकानंद महाविद्यालय आणि राजाराम महाविद्यालय येथे देण्यात येणार आहे. मतदानासाठी ४५० गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटात पाचजणांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रत्येक क्षेत्रीय निवडणूक कार्यालयाकडे ७० गट मतदान प्रक्रिया राबविणार आहेत. सहारिया सोमवारी कोल्हापुरातराज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया सोमवारी (दि. १९) कोल्हापुरात येणार असून, या दिवशी ते निवडणूक कामकाजाची पाहणी करणार आहेत.सर्व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.