संभाजीनगरातील खुल्या जागेवर अखेर महापालिकेचा फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST2021-08-26T04:27:41+5:302021-08-26T04:27:41+5:30

कोल्हापूर : संभाजीनगर प्रभातील यशवंत विद्यालय व लेडिज होस्टेलमधील, ले आऊट (रि.स.नं.६९४) मधील खुली जागा महानगरपालिकेच्या ताब्यात न ...

Finally a municipal board on the open space in Sambhajinagar | संभाजीनगरातील खुल्या जागेवर अखेर महापालिकेचा फलक

संभाजीनगरातील खुल्या जागेवर अखेर महापालिकेचा फलक

कोल्हापूर : संभाजीनगर प्रभातील यशवंत विद्यालय व लेडिज होस्टेलमधील, ले आऊट (रि.स.नं.६९४) मधील खुली जागा महानगरपालिकेच्या ताब्यात न देता जावयाच्या नावावर करून भागतील एजंटच्या माध्यमातून पेपर नोटीस देऊन विक्रीचा घाट अखेर दक्ष नागरिकांनी हाणून पाडला. बुधवारी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीचा फलक लावण्यात आला.

संभाजीनगर प्रभागातील यशवंत विद्यालय व लेडिज होस्टेलमधील, ले आऊट (रि.स.नं.६९४) मधील खुली जागा महानगरपालिकेच्या ताब्यात न देता जावयाच्या नावावर करून भागतील एजंटच्या माध्यमातून पेपर नोटीस देऊन विक्रीचा घाट घातला होता. याबाबत वृत्तपत्रातून जाहिरात आल्यावर त्याची वाच्यता झाली. त्यामुळे भागातील सुज्ञ नागरिकांनी हा ओपन स्पेस वाचवण्याची मोहीम हाती घेतली. महापालिकेकडे तक्रारी झाल्या. माजी नगरसेवक किरण नकाते, भाजपा कार्यकर्ते तुषार देसाई यांनी याबाबत आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला.

Web Title: Finally a municipal board on the open space in Sambhajinagar