कदमवाडीतील सातजणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST2021-01-16T04:26:21+5:302021-01-16T04:26:21+5:30

अमाेल अनिल शेंडगे, रमेश आनंद चांदणे, सिद्धेश सुखदेव फाळके, सत्यम सुखदेव फाळके, बंडा दीपक फाळके, जोतीराम आवळे (सर्व रा. ...

Filed a case against seven persons from Kadamwadi | कदमवाडीतील सातजणांविरोधात गुन्हा दाखल

कदमवाडीतील सातजणांविरोधात गुन्हा दाखल

अमाेल अनिल शेंडगे, रमेश आनंद चांदणे, सिद्धेश सुखदेव फाळके, सत्यम सुखदेव फाळके, बंडा दीपक फाळके, जोतीराम आवळे (सर्व रा. कपूर वसाहत, कदमवाडी), उमेश आनंद चांदणे (रा. चांदणेनगर) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. कपूर वसाहत येथील सामाजिक कार्यकर्त्या कविता माने यांनी या सर्वांविरोधात फिर्याद दिली आहे. कविता यांच्या १६ वर्षाच्या मुलाला या सर्वांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. गळ्याला तलवार लावून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्या मुलाला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे दिलेल्या फिर्यादीनुसार या सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Web Title: Filed a case against seven persons from Kadamwadi