कोरोचीत दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST2021-06-29T04:17:47+5:302021-06-29T04:17:47+5:30

वैभव सुनील खुरपे (वय २९) यांच्या तक्रारीवरून चौगोंडा पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, मलगोंडा पाटील, राजगोंडा पाटील, तर अनिलकुमार ...

Fighting between two groups in Korochit | कोरोचीत दोन गटांत हाणामारी

कोरोचीत दोन गटांत हाणामारी

वैभव सुनील खुरपे (वय २९) यांच्या तक्रारीवरून चौगोंडा पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, मलगोंडा पाटील, राजगोंडा पाटील, तर अनिलकुमार आदगोंडा पाटील यांच्या तक्रारीवरून, वैभव खुरपे, विवेक खुरपे, संगीता, सुनील व एका आजीवर गुन्हा दाखल झाला आहे. सांडपाणी टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण झाली. या हाणामारीमध्ये वैभव याने लाकडी दांडक्याने अनिलकुमार यांच्या पाठीत मारहाण करीत त्यांना जखमी केले. या वेळी सुनील व शकुंतला हे सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही मारहाण केल्याचे अनिल यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर गटारीचे पाणी सोडलेस का, असे म्हणत अनिलकुमार याने वैभव व त्यांच्या आईला दांडक्याने मारहाण करून जखमी केले. तसेच वैभव यांच्या पत्नीच्या पोटात सुनील व अनिल यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राजगोंडा याने वैभव यांच्या डाव्या खांद्यावर कोयत्याने मारहाण केल्याने ते जखमी झाल्याचे वैभव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Fighting between two groups in Korochit