शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कोडोलीत पाटील विरुद्ध कोरे लढत

By admin | Updated: July 7, 2015 01:29 IST

ग्रामपंचायत निवडणूक : यशवंत एकनाथ, भारत पाटील १६ वर्षांनी एकत्र

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोडोली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विलास पाटील हे गट एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तीन पाटील विरुद्ध माजी आमदार विनय कोरे अशी झुंज होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नेमकी कशी आघाडी होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांसाठी २५ जुलैला निवडणूक होत आहे. आता तिथे कोरे गटाची सत्ता आहे. त्या गटाचे १२ व विरोधी यशवंतदादा पाटील गटाचे पाच सदस्य आहेत. कोरे गट गावच्या राजकारणात अल्पमतात होता. भारतअप्पा पाटील यांनी कोरे यांचे नेतृत्व मानून काम करण्यास सुरुवात केल्यावर स्थानिक राजकारणाचे चित्र बदलले. अल्पमतातील कोरे गट सत्तेत आला. स्वत: पाटील २००२ मध्ये पन्हाळा पंचायत समितीचे सभापती झाले. पुढे २००७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या. भारतअप्पा पाटील सोबत असल्यामुळे २००० पासून कोरे गटाचे गावच्या राजकारणात वर्चस्व राहिले. या गटाचे नेतृत्व भारतअप्पा पाटील करत होते. परंतु, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पाटील व कोरे यांच्यात राजकीय वितुष्ट आले. जनसुराज्य पक्षात राहून आपल्याला राजकीय भवितव्य नाही, असे भारतअप्पांना वाटत होते. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतअप्पा तटस्थ राहिले. स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून विधानसभेची शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला ते पुन्हा कोरे यांच्याशीच संगत करणार की काही वेगळा पवित्रा घेणार, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, आता दादा गटाशी त्यांनी संधान बांधल्याने कोरे व भारतअप्पा यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्याचे स्पष्ट झाले. तालुक्याच्या राजकारणातही पडसाद भारतअप्पा पाटील, अमर पाटील, डॉ. जयंत पाटील व स्वाभिमानीचे विलास पाटील यांची जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. सर्वांनी एकत्र यायचे हा निर्णय झाला असून, जागावाटप चर्चेतून ठरवू, असे भारतअप्पा पाटील यांनी स्पष्ट केले. या घडामोडींचा तालुक्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. कोडोली हे कोरे यांचे मूळ गाव. त्यामुळे तेथूनच त्यांच्याविरोधातील राजकारणाला आता विरोध सुरू झाला आहे. यशवंत एकनाथ पाटील व भारतअप्पा हे नातेवाईक आहेत. सोळा वर्षांनंतर ते पुन्हा राजकारणात एकत्र आले आहेत.