शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी लढा द्यावा

By admin | Updated: October 30, 2016 23:59 IST

बी. जी. कोळसे-पाटील : शामराव देसाई जीवन आणि कार्य ग्रंथाचे प्रकाशन

 कोल्हापूर : सध्याची शिक्षण व्यवस्था अशीच सुरू राहिली, तर त्यामुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी बहुजन समाजाने लढा द्यावा, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी येथे केले. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगावमधील ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, महापौर सरिता पाटील, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील प्रमुख उपस्थित होते. निवृत्त न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आणि दर्जेदार देण्याची जबाबदारी शासनाची असावयास हवी; पण विद्यमान सरकारने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे संबंधित जबाबदारी झटकली आहे. सध्या जी शिक्षण व्यवस्था आहे, ती अशीच सुरू राहिल्यास त्यामुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान नजीकच्या काळामध्ये होणार आहे. ते टाळण्यासाठी बहुजन समाजाने लढा देण्यास सिद्ध व्हावे. सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रांतील कार्याद्वारे देसाई यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. डॉ. पवार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांना पुढे नेण्याचे काम शामराव देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळामध्ये केले. त्यामुळेच या परिसराचे परिवर्तन होऊ शकले. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शामराव देसाई यांचे विचार समाजाला आजही उपयुक्त ठरणारे आहेत. हे विचार स्वीकारणे गरजेचे आहे. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, दीपक दळवी, पी. जी. मंडोळकर, प्रकाश मरगाळे, आदी उपस्थित होते. इतिहास प्रबोधिनीच्या संचालिका डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी सूत्रसंचालन केले. राजाभाऊ पाटील यांनी आभार मानले. देसाई यांच्या नावाने पुरस्कार राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यास दरवर्षी ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी यावेळी केली. ते म्हणाले, हा पुरस्कार कायम सुरू राहण्यासाठी किमान दहा लाख रुपयांचा निधी उभारण्यात यावा. यासाठी कोल्हापूरकरांतर्फे एक लाख रुपये दिले जातील.