पंचगंगा नदीत एकजण बुडाल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:26+5:302021-01-23T04:26:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीमध्ये पोहण्यास गेलेला एकजण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. रवींद्र पांडुरंग शिंदे ...

Fear of drowning in Panchganga river | पंचगंगा नदीत एकजण बुडाल्याची भीती

पंचगंगा नदीत एकजण बुडाल्याची भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीमध्ये पोहण्यास गेलेला एकजण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. रवींद्र पांडुरंग शिंदे (वय ४८, रा. यड्राव, ता. शिरोळ) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडली. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोधकार्य सुरू होते.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रवींद्र हे बेघर वसाहतीत पत्नी व दोन मुलांसह राहण्यास असून, ते यड्राव येथे एका यंत्रमाग कारखान्यात काम करतात. शुक्रवारी सकाळी ते कुटुंबासमवेत इचलकरंजीतील पंचगंगा नदीमध्ये धुणे धुण्यासाठी आले होते. यावेळी नदीमध्ये पोहण्यास ते उतरले. त्यांना धापेचा त्रास होता. नदीच्या मध्यापर्यंत गेल्याने त्यांना धाप लागली. त्यामध्ये ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार घरच्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा सुरू केला. ते ऐकून नदीकाठावरील काही युवकांनी मदतीसाठी धाव घेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत रवींद्र बुडाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पानबुड्याच्या मदतीने रवींद्र यांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Fear of drowning in Panchganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.