शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीकडून शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

कुरुंदवाड : महापुरात पीक नुकसानीचा विमा कंपनीकडून पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. एकीकडे पूरग्रस्तांच्या ...

कुरुंदवाड : महापुरात पीक नुकसानीचा विमा कंपनीकडून पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. एकीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून टाळाटाळ होत असताना विमा कंपनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त आहे.

जुलै महिन्यात आलेल्या महापुरात शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या व पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीक नुकसानभरपाई दिली जाते.

येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे वेळेत विम्याची रक्कम भरून विमा उतरविला होता. महापुरात पिके गेल्याने विमा कंपनीकडून पंचनामाही केला आहे. मात्र, पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महिना उलटला तरी विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. शासनाबरोबर विमा कंपनीही शेतकऱ्यांना चिंबवत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत

आहे.

चौकट

रिलायन्स इन्सुरन्स कंपनीकडून सोयाबीनसाठी एकरी ४५० रुपये विमा रक्कम भरून घेतली असून, पूर्णपणे पीक गेलेल्या शेतकऱ्याला एकरी अठरा हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

चौकट

पंचनामा करताना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ टक्के, तर उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची शासनाकडून अथवा विमा कंपन्यांकडून एक रुपयाही रक्कम मिळाली नाही.

-महवीर पाटील,

प्रगतशील शेतकरी, कुरुंदवाड