शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

दुरावलेली वाघाटीची पिल्ली अखेर आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST

मायेची पुनर्भेट : वनविभागाच्या प्रयत्नांना यश कोल्हापूर : कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी ...

मायेची पुनर्भेट : वनविभागाच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला असला, तरी बघ्यांच्या गर्दीमुळे पहिल्या दिवशी दुसऱ्या पिलाची मात्र त्याच्या आईशी भेट झाली नव्हती. यासाठी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी खूप प्रयत्न केले. आईसोबतचा हा मायेच्या पुनर्भेेटीचा सोहळा वनविभागाच्या कॅमेऱ्यात बंद झाला आहे.

कसबा बावडा येथील रमेश पाटील यांच्या उसाच्या शेतात ३० नोव्हेंबर रोजी आढळलेली वाघाटीची ही दोन पिल्ली बिबट्याची असल्याच्या अफवेमुळे काही उत्साही नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. यामुळे त्यांची आई या पिल्लांजवळ आली नाही. ही पिल्ली बिथरून जाऊ नयेत म्हणून बावडा रेस्क्यू फोरमच्या स्वयंसेवकांनी या पिलांना तातडीने वनविभागाच्या नियंत्रण कक्षाकडे सुपूर्द केले.

वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे स्वयंसेवक ऋषिकेश मेस्त्री, अमित कुंभार, समर्थ हराळे, अनिल ढोले, सानिका सावंत, वंशिका कांबळे, अवधूत कुलकर्णी यांच्यासोबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी, बावडा रेस्क्यू फोरमचे स्वयंसेवक, कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल विजय पाटील, वनरक्षक रुकेज मुल्लाणी गेले दोन दिवस या परिसरात ठिय्या मांडून होते.

वाघाटीच्या या दोन पिलांचे अंदाजे वय १३ ते १७ दिवस असून, मादी पिलाने नुकतेच डोळे उघडले होते; तर नर पिलाचे डोळे अद्यापही उघडलेले नव्हते. डॉ. विद्या पाटील यांनी भेट दिलेल्या इन्टेसिव्ह केअर वॉर्मरद्वारे डॉ. वाळवेकर यांनी या दोन्ही पिलांना आईची कृत्रिम ऊब दिली. आईच्या दुधावर अवलंबून असणाऱ्या या पिलांची लवकरात लवकर आईसोबत पुनर्भेट व्हावी म्हणून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांंशी चर्चा केली. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी त्याच ठिकाणी पुनर्भेेटीसाठी या दोन्ही पिलांना सुरक्षितरीत्या ठेवले. ही प्रक्रिया नोंद करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावल्याची माहिती डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली आहे.

पिलांच्या हाकेला आईचा प्रतिसाद

एका पिलाने आईला आवाज देणे सुरू केले; परंतु दिवसभरातील गर्दीमुळे घाबरलेल्या वाघाटीने पिलांना प्रतिसाद दिला नव्हता. दोन ते तीन वेळा जागा बदलल्यानंतर १ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ०५.४९ वाजण्याच्या सुमारास पिलांच्या हाकेला प्रतिसाद देत दबकत-दबकत येऊन मादी पिलास आई घेऊन गेली. मात्र, घाबरल्यामुळे ती दुसऱ्या पिलास घेऊन गेली नाही. मात्र २ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास या दुसऱ्या पिलासही आईने सोबत नेले. आईसोबतच्या या मायेच्या पुनर्भेटीसाठी वनविभागाने केलेल्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.

-------------------------------

फोटो : 0३१२२0२0 -कोल-वाघाटी पिल्लू

फोटो ओळी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शेतात आढळलेल्या वाघाटीच्या पिल्लांची आईशी भेट झाली.

फोटो : 0३१२२0२0 -कोल-वाघाटी मदर

फोटो ओळी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शेतात आढळलेल्या वाघाटीच्या पिल्लाची आईशी झालेली पुनर्भेट वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे.