शाहूवाडीत आषाढी एकादशी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST2021-07-21T04:17:43+5:302021-07-21T04:17:43+5:30

सकाळी सहा वाजता मंदिरातील श्री विठ्ठल, रुक्मिणी यांच्या मूर्तीला माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील त्यांच्या पत्नी गिता पाटील यांच्या ...

In the excitement of Ashadi Ekadashi in Shahuwadi | शाहूवाडीत आषाढी एकादशी उत्साहात

शाहूवाडीत आषाढी एकादशी उत्साहात

सकाळी सहा वाजता मंदिरातील श्री विठ्ठल, रुक्मिणी यांच्या मूर्तीला माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील त्यांच्या पत्नी गिता पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. मूर्तीला वस्त्र नेसवून झाल्यावर फुलांनी सजविण्यात आले. पौरोहित्याकडून पूजा झाल्यावर काकड आरती करण्यात आली. भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, अनिकेत हिरवे, पुरुषोत्तम ओतारी, सुहास ओतारी, अनिकेत हिरवे, बंधू भिंगार्डे, अमोल नागवेकर, दस्तगीर आत्तार उपस्थित होते.

Web Title: In the excitement of Ashadi Ekadashi in Shahuwadi