शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळी येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

निवास वरपे लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : करवीर तालुक्यातील सोनाळी या छोट्याशा खेडेगावात गेल्या त्र्याहत्तर वर्षांपासून रंगविरहित शाडू ...

निवास वरपे

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हालसवडे : करवीर तालुक्यातील सोनाळी या छोट्याशा खेडेगावात गेल्या त्र्याहत्तर वर्षांपासून रंगविरहित शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रत्येकाच्या घरी बसविल्या जातात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या गावातील तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीही शाडू मातीच्याच आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा येथील गणेशोत्सव पर्यावरणपूरक होत आहे.

सोनाळी या गावच्या ग्रामदैवत धाकेश्वराला गावात रंगीत गणपती बसविलेला चालत नाही, अशी आख्यायिका आहे. देवाचा कोप होऊ नये या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी रंगीत अथवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवीतच नाहीत. धाकेश्वर व जय शिवराय या दोन्ही तरुण मंडळांनी गेली चोवीस वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव इको फ्रेण्डली व पर्यावरणपूरक असा साजरा करण्याची प्रथा चालविली आहे.

ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पारंपरिक रीतिरिवाजानुसार कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. डॉल्बीमुक्ती व गणेशोत्सवानंतर निर्माल्याची सुव्यवस्थित विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील ग्रामस्थांनी अखंडित पाळली आहे.

‘शाडू मातीच्या गणेशमूर्ती पुजण्याची प्रथा सोनाळी गावात अखंडित सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता आम्ही विशेष खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतो. पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव साजरा करण्याची आमच्या गावची प्रथा संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अवलंबायला हवी. - मोहन पाटील, सरपंच, सोनाळी

फोटो : सोनाळी (ता. करवीर) येथील धाकेश्वर व जयशिवराय तरुण मंडळांच्या गणेशमूर्ती.