शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्नाटक’वर उद्योजक ठामच

By admin | Updated: July 12, 2014 00:42 IST

हालचाली वाढल्या : १४५० जणांनी केली १४०० एकर जागेची मागणी

कोल्हापूर : उद्योगवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून जाहीर होऊनदेखील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक वीज दरवाढीच्या मुद्द्यावर कर्नाटकात स्थलांतरित होण्याच्या निर्णयावर ठामच आहेत. आज, शुक्रवारी अखेर गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनकडे (गोशिमा) १ हजार ४५० उद्योजकांनी जागेसाठी अर्ज केला असून, त्यांनी एकत्रितपणे १४०० एकर जागेची मागणी केली आहे.पायाभूत सुविधांची कमतरता, वाढलेले वीजदर, पाणी बिलातील वाढ, आदींमुळे वैतागलेल्या उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्यात कोल्हापूरच्या उद्योजकांनी पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यांपासून कार्यवाही सुरू केली. उद्योगांना भेडसविणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी निवेदन देऊन, प्रत्यक्षात चर्चा करून, आंदोलन करूनदेखील उद्योजकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यानंतर ‘गोशिमा’ने ज्या उद्योजकांना कर्नाटकात जमीन हवी आहे, त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले. त्यानुसार आजअखेर १ हजार ५१० अर्जांची विक्री झाली असून, त्यापैकी १ हजार ४५० उद्योजक कर्नाटकमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. त्यांनी एकत्रितपणे सुमारे १ हजार ४०० एकर जागेची मागणी केली आहे. केंद्रात बहुमत असलेले सरकार आणि या सरकारकडून उद्योगवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प जाहीर झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील हे उद्योजक कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतली, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्प जरी, उद्योगवाढीला पोषक असला, तरी वीज दरवाढ कमी करण्याबाबत राज्य सरकारकडून काहीच हालचाली नसल्याने कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा पक्का निर्णय संबंधित उद्योजकांनी घेतला आहे. कोगनोळी, आडी, मगलेट्टी, इंचनाळ, कसनाळ, कारदगा, चिंचगणी, जैनापूर, गळदगा येथील भूसंपादनाचा सर्व्हे करून त्याबाबतचा अहवाल कर्नाटकच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. अपेक्षित आणि आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाकडून हालचाली वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)