शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह अभियंत्यास शिक्षा

By admin | Updated: December 4, 2014 00:59 IST

‘आयआरबी’चा रस्ता : टेंबलाई उड्डाणपुलावरील मृत्यू

कोल्हापूर : येथील टेंबलाई रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना दिलीप दादू अंब्रे (वय ३५, रा. मोहरे, ता. पन्हाळा) यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने प्रथमवर्ग न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी पुणे येथील बांधकाम ठेकेदारासह अभियंत्यास एक महिन्याचा कारावास व १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा आज, बुधवारी सुनावली. संशयित आरोपी प्रकाश गंगाधर पटवर्धन (रा. पुणे) व सदाशिव मलाप्पा कुंभार (रा. कोरोची, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापुरातील ‘आयआरबी’ कंपनीतर्फे झालेल्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील हे काम आहे. परंतु या अपघातप्रकरणी टोलविरोधी कृती समितीने त्यावेळी कंपनीवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही हा गुन्हा ठेकेदारांवर नोंदला गेल्याने कंपनी बाजूलाच राहिली आहे. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना दि. १७ जून २०११ रोजी दिलीप अंब्रे हे पहाटे दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी या उड्डाणपुलाचे काम सुरु होते. सुमारे ५० टक्के काम झाले होते. त्यामुळे ठेकेदाराने पूल वाहतूकीसाठी बंद असल्याबाबतचे फलक लावायला हवा होता अथवा पूलावरील प्रवेशच बंद ठेवायला हवा होता परंतू त्यातील कोणतीच दक्षता न घेतल्याने पहाटेच्या अंधारात आंब्रे मोटारसायकलवरून पुलावरून दुचाकीसह खाली कोसळले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयआरबी कंपनीतर्फे पुण्यातील ठेकेदार प्रकाश पटवर्धन यांच्याकडे हे काम दिले होते. हे काम अभियंता सदाशिव कुंभार यांच्या देखरेखीखाली सुरू होते. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल एस. बी. गाडवे यांनी अपघाताचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी आज, बुधवारी न्यायाधीश डांगे यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी वकील रंजनी गुजरे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश डांगे यांनी संशयित आरोपी प्रकाश पटवर्धन व अभियंता सदाशिव कुंभार यांना एक महिन्याची शिक्षा व १० हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)