शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती मस्त.. प्रशासन अन् राजकारणी मात्र सुस्त..!

By admin | Updated: September 10, 2014 00:27 IST

आजरा तालुक्यातील चित्र : हत्तींच्या उपद्रवाच्या दिवसागणिक अनेक घटना

कृष्णा सावंत - पेरणोली -गेले महिनाभर आजऱ्याच्या पश्चिम भागात हत्तींचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. हत्तीच्या धुमाकुळीकडे प्रशासन, राजकारण्यांसह कुणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यामुळे ‘हत्ती मस्त... प्रशासन आणि राजकारणी झाले सुस्त...’ अशी आजरा तालुक्याची अवस्था झाली आहे.हत्तींचा उपद्रव आजऱ्यासह चंदगड व भुदरगड तालुक्यांत अनेक वर्षांपासून सुरू आहे. हत्तींना माघारी पाठविण्याच्या वनविभागाच्या मोहिमेशिवाय कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन:पुन्हा आजरा व चंदगड तालुक्यांत हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी मंडळींनी याकडे एकदाही गांभीर्याने पाहिलेले नाही.यापूर्वी हत्तीने हल्ला केलेल्या अनेक घटना आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांत घडलेल्या आहेत. भादवणमधील विजय गोरे यांना हत्तीने गंभीर जखमी केल्यानंतर आजरा तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. हाळोली, मसोली, पेरणोलीहून भुदरगडकडे जाणारा हत्ती आता भादवण व हाजगोळी परिसरातही वावरू लागला आहे. भादवणमधील घटनेनंतर सोहाळेवरून पेरणोली परिसरात हत्ती आला. तो पेरणोलीमधील दलित वस्तीशेजारी रात्रीच अमित सावंत यांना दिसला. प्रसंगावधान राखून सावंत यांनी तेथून पळ काढला.हत्तींच्या उपद्रवाच्या दिवसागणिक अनेक घटना घडत आहेत. त्याकडे वनविभाग वगळता कोणाचेही लक्ष नाही. तालुक्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. आमदार के. पी. पाटील यांच्या मतदारसंघात सातत्याने हत्तींचा उपद्रव आहे. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील वझरे परिसरातही हत्तींचा उपद्रव असतो, तर चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या मतदारसंघातूनच हत्ती येण्यास सुरुवात होते. या तीनही आमदारांनी ठोस उपाययोजनेबाबत सभागृहात आवाज उठविला नसल्याबद्दल खेद व्यक्त होत आहे. रस्ते विकास म्हणजेच खरा विकास समजून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष होत आहे.जनजागृती हवी, गैरसमज दूर व्हावेतवनविभागाने हत्तींना माघारी पाठविण्याची मोहीम राबविण्यापेक्षा हत्ती बिथरू नये, यासाठी तीनही तालुक्यांत जनजागृती व जनतेमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. हत्ती का येतात, याचा अभ्यास करून उपाययोजना राबविण्यासाठी जनचळवळ उभी करण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्याचा हा परिणाम आहे.- कॉ. संपत देसाई, निमंत्रक, पर्यावरण संवर्धन संघर्ष समिती