गव्‍याच्या धडकेत वृद्ध जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST2021-03-08T04:22:30+5:302021-03-08T04:22:30+5:30

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील माणिचावाडा येथे गव्‍याने दिलेल्‍या धडकेत वृद्ध जखमी झाले. जनू तमू येडगे (वय ७०) असे त्यांचे ...

Elderly man injured in grenade attack | गव्‍याच्या धडकेत वृद्ध जखमी

गव्‍याच्या धडकेत वृद्ध जखमी

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील माणिचावाडा येथे गव्‍याने दिलेल्‍या धडकेत वृद्ध जखमी झाले. जनू तमू येडगे (वय ७०) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी माणिचावाडा येथून ते पायी घरी जात होते. घरापासून काही अंतरावरील ओढ्यानजीक त्‍यांना गव्‍याने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यांच्या डोक्‍याला, खांद्याला गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍यांना उपचारासाठी सीपीआर रुग्‍णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

सावर्डेत विषप्राशनाने मृत्‍यू

कोल्‍हापूर : विषारी द्रव्य प्राशन केल्‍याने प्रकृती अत्यवस्थ बनलेले राजाराम सखाराम भाट (वय ५०, रा. सावर्डे दुमाला,ता. करवीर) यांचा मृत्‍यू झाला. सोमवारी (१ मार्च) राहत्‍या घरी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले होते. सीपीआरमध्‍ये उपचार सुरू असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

झाडावरून पडून जखमी

कोल्‍हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे येथे आंब्‍याच्‍या झाडावरून पडल्‍याने यशवंत सखाराम कांबळे (वय ४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले होते. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

Web Title: Elderly man injured in grenade attack