शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

'दत्त'ची सामाजिक बांधीलकी आदर्शवत - विकास खरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

शिरोळ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शासनाने दिलेल्या सुचनांचे ...

शिरोळ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी कोविड सेंटर सुरू करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. इतरांनी दत्तचा आदर्श घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले.

येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याच्यावतीने सोमवारी कोविड सेंटरचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. खरात यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. पी. एस. दातार, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील प्रमुख उपस्थित होते.

गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जनतेच्या सोयीसाठी गतवर्षी याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे येथे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यापैकी २५ ऑक्सिजन बेड आहेत. सेंटरमध्ये व्हेंटिलेटरचीही सोय करण्यात येणार आहे. सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळणार आहेत.

याप्रसंगी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अ‍ॅड. प्रमोद पाटील, विजय सूर्यवंशी, शेखर पाटील, महेंद्र बागे, दरगु गावडे, संजय पाटील, साहेबलाल पाटील, श्रीशैल हेगाणा, अशोक शिंदे, डॉ. नितीन मगदूम, दादासाहेब काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो - १२०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरोळ येथे दत्त कारखान्याच्या पुढाकाराने कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, गणपतराव पाटील, अमरसिंह पाटील, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.