शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच पेन्शन, साखरेचे निर्यात मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

गडहिंग्लज : पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच देशातील शेतकऱ्यांना चार महिन्यांची थकीत पेन्शन आणि कारखान्यांना साखर निर्यातीचे ...

गडहिंग्लज : पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच देशातील शेतकऱ्यांना चार महिन्यांची थकीत पेन्शन आणि कारखान्यांना साखर निर्यातीचे अनुदान मिळाले. हे दिल्लीतील आंदोलनाचे फलित आहे. गव्हाला हमीभाव आणि करारशेतीचा कायदा रद्दच्या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीत महिनाभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किमान ‘मन की बात’मध्ये तरी जाणून घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केली.

गडहिंग्लज नगरपालिकेला राज्य शासनाकडून मिळालेल्या १० कोटी निधीतील विकासकामांचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.

मुश्रीफ म्हणाले, हद्दवाढीमुळे गडहिंग्लज शहरात आलेल्या उपनगरांच्या मूलभूत नागरी सुविधांसाठी निधी देण्याचे आश्वासन आपण विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते, त्याची वचनपूर्ती झाली. मार्चपर्यंत आणखी १० कोटींचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून गडहिंग्लज पालिकेला मिळवून देईन.

शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाची सत्ता असतानाही गडहिंग्लज पालिकेला निधी देऊन मुश्रीफांनी प्रचलित राजकारणाला फाटा दिला आहे. गडहिंग्लजमधील बेघरांना घरे बांधून देण्यासाठीही त्यांनी सहकार्य करावे.

यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी आभार मानले.

-------

चौकट प्रांत कार्यालयाची जागा

पालिकेला मिळवून देऊ! प्रांत कार्यालयासाठी गडहिंग्लज नगरपालिकेने भाड्याने दिलेली जागा महिनाभरात पुन्हा पालिकेला

मिळवून देऊ,अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

----------- चंद्रकांतदादांनी द्वेषाचे राजकारण केले

विधानपरिषदेच्या निवडणुकीत विशिष्ट व्यक्तीला मदत केल्याबद्दल चंद्रकांतदादांनी गडहिंग्लज पालिकेला पाच कोटींचा निधी दिला होता; परंतु गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत श्रीपतराव शिंदे यांनी आमच्याबरोबर आघाडी केल्यामुळे दिलेला निधी त्यांनी परत घेतला. तसेच जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांना शासनाकडून मिळालेला प्रत्येकी एक कोटीचा निधीही त्यांनी दिला नाही. त्यांच्यासारखा द्वेषी राजकारणी मी पाहिला नाही, अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली.

---------

फोटो ओळी- गडहिंग्लज शहरातील विकासकामांचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्ष स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, बसवराज खाणगावे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व नगरसेवक उपस्थित होते. (मजिद किल्लेदार)