दारुच्या नशेत आई, बहिणीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST2021-04-20T04:26:15+5:302021-04-20T04:26:15+5:30

कोल्हापूर : दारुच्या नशेत आई व बहिणीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने व हातातील किटलीने मारुन जखमी केल्याचा प्रकार रामानंद नगरात ...

Drunk mother, sister beaten | दारुच्या नशेत आई, बहिणीला मारहाण

दारुच्या नशेत आई, बहिणीला मारहाण

कोल्हापूर : दारुच्या नशेत आई व बहिणीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने व हातातील किटलीने मारुन जखमी केल्याचा प्रकार रामानंद नगरात घडला. याप्रकरणी मुलगा अखिलेश बाळासाहेब बोडके (रा. रामानंद नगर) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अखिलेश बोडके हा दारुच्या नशेत पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत होता. यावेळी त्याची आई अंजना बाळासाहेब बोडके व बहीण मनिषा किशोर पाटील ह्या सोडविण्यासाठी गेल्या. त्यावेळी संशयिताने त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातातील किटली डोक्यात मारली. यामध्ये आई अंजना बोडके ह्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात आईने दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा अखिलेश बोडके याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Drunk mother, sister beaten