डाॅ. व्ही. जी. बेळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:41+5:302021-02-06T04:42:41+5:30

रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बेळे हे पालिकेतील सत्तारूढ युवक क्रांती आघाडीचे अध्यक्ष आणि वडगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष ...

Dr. V. G. Bele passed away | डाॅ. व्ही. जी. बेळे यांचे निधन

डाॅ. व्ही. जी. बेळे यांचे निधन

रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

बेळे हे पालिकेतील सत्तारूढ युवक क्रांती आघाडीचे अध्यक्ष आणि वडगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते.

वडगाव पालिकेचे १९९१ व २००१ च्या कालावधीत १० वर्षे नगरसेवक होते. शहराच्या विकासात आणि आरोग्यविषय कामात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. शिवाजीराव सालपे यांचे सहकारी म्हणून काम केले. जुन्या काळातील वैद्यकीय सेवा देणारे फॅमिली डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. कोरोना काळात अखंडित वैद्यकीय सेवा डाॅ. बेळे यांनी दिली होती. त्यामुळे पालिकेच्यावतीने कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, डाॅ. विशाल, इंजिनिअर कुणाल, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान. डाॅ. बेळे यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. लिंगायत समाज स्मशानभूमीत शोकसभा झाली. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, रंगराव पाटील-बावडेकर, संतोष गाताडे, बाळासाहेब घोटणे, डाॅ. मिलिंद हिरवे, डाॅ. सूरज कुडाळकर, दीपक खरोसे यांनी मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली. रक्षाविसर्जन रविवारी आहे.

फोटो ईमेल - ०४व्ही. जी. बेळे

Web Title: Dr. V. G. Bele passed away