शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणींना दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना आला आणि मोलकरणी वर्षानुवर्षे ज्यांच्या घरी धुणं-भांडी, फरशी-केर, अशी कामं करून आपले कुटुंब चालवायच्या त्यांची कामं ...

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना आला आणि मोलकरणी वर्षानुवर्षे ज्यांच्या घरी धुणं-भांडी, फरशी-केर, अशी कामं करून आपले कुटुंब चालवायच्या त्यांची कामं बंद झाली. कामावरच आला नाही म्हणून लोकांनी पगारसुद्धा दिला नाही. सहा-सात महिने घरात बसून काढली, आता पुन्हा काम मिळायला सुरुवात झाली तोपर्यंत परत कोरोना संसर्ग वाढू लागला. अशा परिस्थितीत घरेलू महिला कामगारांना घर कसं चालवायचं याची चिंता लागली आहे. शहरात दहा हजारांवर घरेलू कामगार असून पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीनेच त्यांच्या पोटात गोळा आला आहे.

--

मदतही मिळाली नाही..

मोलकरणीला एका कामाचे पाचशे ते सहाशे रुपये मिळतात जे व्यक्ती संख्येवर अवलंबून असतात. धुणं, भांडी, केर काढणे, फरशी पुसणे अशी वेगवेगळी कामं असतात. काही कारणांमुळे बरेच कामावर जाता नाही आले तर पगार कमी होतो. गेल्यावर्षी सहा महिने बसून काढावे लागते पण या काळात मोजकी कुटुंब वगळले तर कोणीही आम्हाला जीवनावश्यक देऊन किंवा आर्थिक मदत केली नाही सरकारने रेशनवर तांदूळ दिले म्हणून कसंबसं पोट भरलो असा अनुभवही या महिलांनी सांगितला.

---

कोरोना सुरू झाल्यावर तीन घरची कामं सुटली. संस्था, दानशूर लोक मदत करायचे त्यात घर चालवलं. आता फक्त एका घरचं काम चालू आहे. कमवणारी मी एकटी. पाचशे रुपयात खर्च कसा भागवायचा.

बेबी मुश्रीफ (लाईन बाजार)

--

आमच्या घरात पाच माणसं, घर माझ्यावरच चालतंय. पाच घरची कामं करत होते. सगळी सुटली. ज्यांच्या घरी काम करायचे त्यांनी मदत पण केली नाही. रेशनवरचं धान्य मिळालं म्हणून एकवेळ तरी पोटभर अन्न मिळायचं. आता परत लॉकडाऊन करणार म्हटल्यावर काम सुटणार आमच्या परिस्थितीचा शासनाने विचार करायला हवा.

शोभा खाडे (शिवाजी पेठ)

--

मी गेल्या २५ वर्षांपासून घरकामाला जाते. विश्वासावर आमचं पोट चालतंय पण कोरोना आला आणि आमच्यावरचा विश्वास पण उडाला. आम्हाला पण स्वत:ची काळजी वाटतेच की, पण हे समजून न घेता लोकांनी आमची कामं बंद केली. घरात नऊ माणसं मिळवणारी मी एकटी म्हणून १० कामं करत होते. आता हॉटेलमध्ये कामाला जात होते ते पण बंद झालं. सांगा आम्ही कसं जगायचं.

शमा मुल्ला (साळोखेनगर)

---