शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘सावित्रीबाई फुले’तील डॉक्टर झाले गायब

By admin | Updated: April 10, 2015 01:03 IST

रुग्णांची हेळसांड : आठपैकी एकच डॉक्टर उपस्थित; दररोज ३०० रुग्णांची हेळसांड; कारभार आलबेल

संतोष पाटील - कोल्हापूर--  महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी अघोषित सुटी घेतली. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून डॉक्टरांची वाट पाहणाऱ्या रुग्णांना अकरा वाजेपर्यंत डॉक्टर न आल्याने निराश होऊन परतावे लागले. येथील आठ डॉक्टरांपैकी फक्त एकाच डॉक्टरना रुग्णालयात येण्यास वेळ मिळाला. डॉक्टरांच्या मनमानीपणाबद्दल महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने दररोज ३०० हून अधिक बाह्यरुग्णांची हेळसांड होत आहे. महापालिकेच्या शहरातील आरोग्य केंद्रांत पुरेसे वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, रुग्णालयातून गायब होणाऱ्या डॉक्टरांमुळे वैद्यकीय सेवेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे.सावित्रीबाई फुले रुग्णालयात आठ डॉक्टरांची नेमणूक आहे. मात्र, एकही डॉक्टर वेळेत हजर राहत नाहीत, अशी येथील रुग्णांची तक्रार असते. नेहमीप्रमाणे येथील सेवा बजाविणाऱ्या डॉक्टरांपैकी फक्त एकच डॉक्टर रुग्णालयात आले. सुपरिंटेंडेंटनी ‘मुंबईहून रात्री उशिरा आल्याने कामावर येत नसल्या’चा निरोप धाडला, तर उर्वरित डॉक्टरांनी रुग्णालयाकडे पाठ फिरविली. सकाळी आठ वाजल्यापासून गरीब व गरजू रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत बसले होते. अकराच्या सुमारास एका क्षयरुग्णाला इंजेक्शनमुळे चक्कर आली. हडबडलेल्या यंत्रणेने दुसरीकडून एका डॉक्टरना बोलावून जुजबी उपचार केले.बहुतांश डॉक्टर अकरा वाजल्यानंतरच रुग्णालयात येतात. कसेतरी तासभर थांबून गायब होतात. सकाळपासून येथे बाह्यरुग्णांचा राबता असतो. मात्र, डॉक्टर जाग्यावर नसल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. डॉक्टरांची तपासणी झाल्याखेरीज पुढील हालचाल करता येत नसल्याने रुग्णांसह परिचारिका व इतर कर्मचारीही हाताची घडी घालून बसतात. रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार करूनही वरिष्ठ स्तरावरून दखल घेतली जात नसल्याने तक्रारींचे प्रमाणही अत्यल्प आहे. प्रशासनाला आव्हानमहापालिकेतर्फे शहरातील नागरिकांसाठी अत्यल्प दरात रुग्णसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सावित्रीबाई फुले, पंचगंगा व आयसोलेशन हॉस्पिटल अशी तीन मोठी, तर २५ लहान आरोग्य कें दे्र सेवेत आहेत. यामध्ये विविध पदांवर दीड हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे; तर ३० हून अधिक डॉक्टर सेवेत आहेत. सर्व रुग्णालयांसह आरोग्य केंद्रांतून तब्बल पाचशेहून अधिक रुग्णांना लाभ होतो. रुग्णसेवा जलद व दर्जेदार होण्यासाठी मानसेवी डॉक्टर नेमण्याची घोषणा प्रशासनाने केली; मात्र, मानसेवी राहू देत, आहेत ते डॉक्टरसुद्धा रुग्णालयाकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे. डॉक्टरांनी थेट प्रशासनालाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.महिन्याला सहाशे ते सातशे सोनोग्राफी व इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी बाहेरील दोन ते तीन मोजक्या ठिकाणांच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. येथे यंत्रणा असूनही या चाचण्या घेण्याचे टाळले जाते. गर्भवती महिलांना थायरॉईड व अनेक वेळा सोनोग्राफीसारख्या चाचण्या कारण नसताना करणे भाग पाडले जाते. असे अनेक अवैध प्रकार महापालिकेच्या रुग्णालयात सुरू आहेत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासकीय सुधारणेचा भाग म्हणून रुग्णालयांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.रुग्णालयातील दोन डॉक्टर ट्रेनिंगवर आहेत. एक महिला आयोगापुढे साक्ष देण्यासाठी मुंबईला गेले. दोन डॉक्टर रजेवर आहेत. असे असले तरी येथील रुग्णसेवेवर परिणाम न होण्याची काळजी घेतली आहे. - डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी