शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आमिषाला भुलू नका, ‘मत’दानच करा

By admin | Updated: October 31, 2015 00:27 IST

मतदारांचे प्रबोधन : मतदानवाढीसाठी विविध संघटनांचे प्रयत्न

कोल्हापूर : कोणत्याही आमिषाला भुलून मतदारांनी आपले मत विकू नये. शिवाय यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदार प्रबोधनाचा उपक्रम कोल्हापूर कॉलिंग, क्रिडाई कोल्हापूर, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स आणि व्यापारी महासंघातर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहिती ‘कोल्हापूर कॉलिंग’चे संकल्पक पारस ओसवाल व क्रिडाई कोल्हापूरचे सचिव विद्यानंद बेडेकर यांनी दिली.ओसवाल म्हणाले, हद्दवाढ, ढपला व भ्रष्टाचारमुक्त सभागृह, थेट पाईपलाईन योजना, विमानतळ विस्तारीकरण, विमानसेवा, महापालिका शाळांतून दर्जेदार शिक्षण, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, टोलमुक्त शहर, आदी मुद्द्यांवर शहरातील विविध क्षेत्रातील लोक कोल्हापूर कॉलिंगच्या माध्यमातून कार्यरत आहेत. शहराचा रचनात्मक विकास होण्यासाठी तांत्रिक ज्ञान असलेले नगरसेवक महापालिकेत निवडून जाणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने मतदान होणे गरजेचे आहे. शिवाय मतदानाचा टक्कादेखील वाढणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन मतदार प्रबोधनाचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. याअंतर्गत मतदानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या २५ हजार पत्रकांचे शहरातील घरोघरी वाटप केले आहे. त्यासह प्रबोधनाचे रथ असलेले दोन टेम्पो फिरत आहेत. कोणत्याही आमिषाला भुलून जाऊन शहरवासीयांनी आपले मत न विकता योग्य उमेदवाराला खऱ्या अर्थाने ‘मत’दान करावे, असे आवाहन त्यांनी केले.बेडेकर म्हणाले, पत्रकांसह व्हॉटस्-अ‍ॅप, फेसबुक अशा सोशल मीडियांद्वारे प्रबोधन केले जात आहे. विविध व्यवसायांत कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पक्षांनी मांडलेल्या जाहीरनाम्यांतून काही मुद्दे घेऊन आम्ही एकत्रित जाहीरनामा बनविला असून तो विजयी उमेदवारांसमोर मांडण्यात येईल. यावेळी आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर, क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, चार्टर्ड अकौंटंट महेश धर्माधिकारी, हॉटेल मालक-चालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, आदी उपस्थित होते. विजयी उमेदवारांचा ८ नोव्हेंबरला सत्कारसर्व विजयी उमेदवारांचा कोल्हापूर कॉलिंगतर्फे ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाचला धैर्यप्रसाद हॉलमध्ये सत्कार करुन त्यांच्यासमोर शहर विकासाचा एकत्रित अजेंडा मांडण्यात येईल, असे पारस ओसवाल यांनी सांगितले.