सभा गुंडाळू नका, सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्या -प्रसाद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:42+5:302021-09-11T04:24:42+5:30

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेची आज, शनिवारी होणाऱ्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी सभा न गुंडाळता सभासदांच्या प्रश्नांची सविस्तर ...

Do not close the meeting, answer the questions of the members - Prasad Patil | सभा गुंडाळू नका, सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्या -प्रसाद पाटील

सभा गुंडाळू नका, सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्या -प्रसाद पाटील

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेची आज, शनिवारी होणाऱ्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी सभा न गुंडाळता सभासदांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या, अन्यथा बँकेसमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व बँकेचे संचालक प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील यांनी पत्रकाव्दारे दिला.

बँकेच्या २००९ ते २०१५ या कालावधीत एकहाती सत्ता असतानाही तत्कालीन कारभारी मंडळींनी अनेक गैरव्यवहार केल्याने त्यांना बोगस नफा दाखवावा लागला. आम्ही २०१५ मध्ये लावलेल्या चौकशीत सन २०१३ ते १५ सालातील नफा बोगस असल्याचे सहकार खाते व रिझर्व्ह बँकेच्या चौकशीत सिध्द झाले आहे. गेल्या सहा वर्षात विरोधी संचालकांनी सक्षम भूमिका बजावल्याने सत्ताधाऱ्यांच्या उधळपट्टीला आळा बसला असून बँकेच्या इतिहासात प्रथमच सभासदांना १०.५ टक्के इतक्या कमी व्याज दराने कर्ज मिळत आहे. आता बँकेला २ कोटी ६० लाख रुपये झालेला नफा वास्तव असून नवीन सभासद होण्यापासून त्यांना कर्ज मिळवण्यासाठी संचालकांच्या घरांचे उंबरे झिजवण्याची जुनी परंपरा खंडित केली आहे. हे जरी खरे असले तरी सभासदांचे अनेक प्रश्न आहेत, ऑनलाइन सभेत ती लेखी विचारली आहेत, त्याची उत्तरे अध्यक्षांनी द्यावीत, अन्यथा बँकेसमोर आंदोलन करू, असा इशारा प्रसाद पाटील व एस.के. पाटील यांनी दिला.

Web Title: Do not close the meeting, answer the questions of the members - Prasad Patil