वितरण वृत्त : राष्ट्रीय किसान मोर्चाचा जेलभरो आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:54+5:302021-01-21T04:22:54+5:30
कोल्हापूर : कोणालाही विश्वासात न घेता पाशवी बहुमताच्या बळावर मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रीय किसान ...

वितरण वृत्त : राष्ट्रीय किसान मोर्चाचा जेलभरो आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : कोणालाही विश्वासात न घेता पाशवी बहुमताच्या बळावर मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर उतरून निदर्शने केल्यानंतर कायदे मागे घेतले नाहीत तर जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे देशभरातील साडेपाचशे जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलने झाली. कोल्हापुरातही दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून मोदी सरकारला इशारा देण्यात आला. कृषी कायदे शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे असल्याने ते त्वरित मागे घ्यावेत यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार करण्यात आला. आंदोलनात महेश बावडेकर, नामदेव गुरव, इंदिरा पटवर्धन, सागर सुळेकर, चंद्रकांत नागावकर, स्मिता सरदार, गौरव पनुरेकर, कुलदीप जोगडे, सारिका कांबळे, आशालता सरनाईक, अनिता बावडेकर यांनी सहभाग घेतला.