शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली करणार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:12 IST

राज्यात गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानाने अद्ययावत व्हा. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी शिक्षकांना केले.

ठळक मुद्दे विस्थापित शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली करणार : हसन मुश्रीफप्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा

कोल्हापूर : राज्यात गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानाने अद्ययावत व्हा. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी शिक्षकांना केले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे येथील गणेश लॉनमधील राज्यस्तरीय महामंडळ सभेत ते बोलत होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी प्रास्ताविकातून विविध मागण्या मांडल्या. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे तुमचे छोटे असणारे प्रश्न आता गंभीर बनले आहेत. आपल्या सर्वांचे नेते शरद पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बदलीबाबतच्या धोरणात तातडीने सुधारणा करणार आहे. त्यात २७ फेब्रुवारी २०१७ च्या राज्यस्तरीय आॅनलाईन खो-खो बदली प्रक्रिया धोरणात दुरूस्ती करण्यात येईल.

सन २०१८ आणि २०१९ या वर्षांतील बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांची प्राधान्याने सोयीची बदली केली जाईल. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक ग्रामविकास विभागाला नवीन सचिव मिळाल्यानंतर लगेच काढण्यात येईल.

या सभेच्या प्रारंभी शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध १६ मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संभाजीराव थोरात यांनी दिले. प्रवीण यादव, रविकांत आडसूळ, संजय जगताप, प्रवीण कांबळे, आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्रकाश येडगे, लक्ष्मी पाटील, जयवंत पाटील,आदींसह राज्यभरातील शिक्षक उपस्थित होते. स्वाती शिंदे, महेश घोटणे, किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेघनाथ गोसावी यांनी स्वच्छतेचा पोवाडा सादर केला.

काही मागण्या अशा

  •  १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  • नगरपालिका, महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे.
  • २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेशक नवीन बदली धोरण तयार करावे.
  • शिक्षकांना बीएलओंसह इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे.
  • संगणक प्रशिक्षणास मुदतवाढ देऊन झालेली वसुली परत द्यावी.

 

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर