शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

दिनकर मोहिते यांना खडसावले

By admin | Updated: June 4, 2016 00:58 IST

वारणा चोरीप्रकरण : कसला तपास करताय? सत्य समोर आणा : पोलिस अधीक्षक

कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील साडेचार कोटी रुपये चोरीप्रकरणी अडीच महिन्यांमध्ये केलेल्या तपासात संशयित विनायक जाधव रेकॉर्डवर कसा आला नाही? पोलिसांच्या तपासाबाबत लोक शंका घेत आहेत. या प्रकरणामागचे सत्य पुढे आणा. कोणतीही गोष्ट लपविण्याचा प्रयत्न करू नका, अशा कडक शब्दांत शुक्रवारी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना सुनावले. दरम्यान, चोरलेल्या पैशांतील ६९ लाख ५० हजार रुपयांच्या हिश्श्यावरून मैनुद्दीन मुल्ला व विनायक जाधव यांच्यात सायबर चौकात वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. त्याची मोबाईल व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या रकमेचा व संशयित जाधव याचा उलगडा झाला. फरारी मैनुद्दीनचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संशयित विनायक महादेव जाधव (वय ३५, रा. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या मित्राकडील वारणानगर येथील चोरीमधील सुमारे ६८ लाख रुपये घेऊन मैनुद्दीन ऊर्फ अबुबकर मोहद्दीन मुल्ला पसार झाल्याने खळबळ उडाली. अडीच महिन्यांपूर्वी मिरजेतील बेथलहेमनगर येथून सांगली पोलिसांना संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्या मेहुणीच्या घरातून सुमारे तीन कोटी सात लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर कोडोली पोलिसांनी वारणानगर शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ खोलीतून आणखी एक कोटी २९ लाख रुपये हस्तगत केले होते. मैनुद्दीनने साथीदार रेहान अन्सारी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास केला. मैनुद्दीनकडे केलेल्या चौकशीमध्ये कोठेही ६९ लाख ५० हजार किंवा संशयित विनायक जाधव हा स्वत: चोरी करण्यास असतानाही रेकॉर्डवर आला नाही. जाधव याने चोरीचे पैसेही स्वत:च्या तवेरा गाडीतून नेले होते, ती गाडीही पोलिसांच्या तपासामध्ये कोठे आली नाही. पोलिसांच्या तपासातील विसंगती पुढे आल्याने त्यांनीही रकमेवर डल्ला मारल्याची चर्चा जिल्ह्यात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी पोलिस अधीक्षक देशपांडे यांना विचारला. अन्सारीचा संबंध नाही! पोलिसांनी मैनुद्दीनचा साथीदार रेहान अन्सारी हा फरार असल्याचे दाखविले आहे. त्याच्या तपासासाठी बिहारला पथकही पाठविले नाही. आता मात्र हेच पोलिस या गुन्ह्यामध्ये ‘अन्सारीचा संबंध असल्याचे दिसून येत नसल्या’चे सांगत आहेत! वारणेच्या चोरीप्रकरणात विनायक जाधव हा स्वत: सहभागी होता. त्याच्याच गाडीतून पैसे नेण्यात आले, ही गोष्ट कुठेही तपासामध्ये पुढे आली नाही. तपास कसा करताय? लोक पोलिसांच्या तपासाबाबत शंका घेतील असा तपास करू नका, या प्रकरणातील सत्य पुढे आणा.- प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक