शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप पोवार यांचे नगरसेवकपद धोक्यात

By admin | Updated: November 26, 2015 00:34 IST

विनापरवाना बांधकाम : मनपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विखंडित

कोल्हापूर : महानगरपालिकेवर निवडून येऊन अद्याप महिना झाला नाही तोवरच काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पोवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पदाचा गैरवापर करून तत्कालीन नगरसेविका सरस्वती पोवार व दिलीप पोवार यांनी केलेल्या विनापरवाना बांधकामामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. सरस्वती पोवार व त्यांचे पती दिलीप पोवार यांनी कनाननगर परिसरात विनापरवाना बांधकाम केले आहे. महापालिकेकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण महापालिका अधिनियमांतील कलम (१२) नुसार चौकशीसाठी न्यायाधीशांकडे पाठविण्यास मंजुरी मिळावी म्हणून प्रशासनाने महासभेसमोर प्रस्ताव ठेवला होता, परंतु मनपा सदस्यांनी तो १७ जानेवारी २०१५च्या महासभेत नामंजूर केला. त्यानंतरही प्रशासनाने विधिज्ञांच्या अभिप्रायानुसार हा निर्णय चुकीच्या माहिती व गृहितकांच्या आधारावर झाल्याचे स्पष्ट होत असल्याने तोच प्रस्ताव फेरविचारार्थ पुन्हा महासभेकडे सादर करण्यात आला. सदरचा प्रस्तावही २० मार्च २०१५ च्या सभेतही नामंजूर करण्यात आला. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासनाचा प्रस्ताव व महासभेने केलेले ठराव राज्य सरकारकडे पाठवून त्यावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. अनधिकृत बांधकामामुळे मनपा कायद्यातील तरतुदींचा भंग होत असल्याने महासभेने मंजूर केलेले दोन्ही ठराव राज्य सरकारने निलंबित केले होते आणि सरस्वती पोवार यांना एक महिन्याच्या आत अभिनिवेदन करण्याची संधी दिली; परंतु त्यांना आपली बाजू मांडता आली नाही. त्यामुळे महापालिकेने मंजूर केलेले दोन्ही ठराव विखंडित केले, तसा आदेश राज्य सरकारचे सह. सचिव प्र. ता. गौड यांनी मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर)ला काढला आहे.