शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील धुडगूस भाजपच्या इशाऱ्यावरूनच : विक्रम ढोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST

कोल्हापूर : जेजुरीच्या खंडोबा गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलेला धुडगूस ...

कोल्हापूर : जेजुरीच्या खंडोबा गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातलेला धुडगूस आणि त्यानंतर भाजप नेते भूषणसिंह होळकर यांनी घेतलेली भूमिका हा भाजपने रचलेल्या षड्‌यंत्राचा भाग आहे. पडळकर आणि होळकर यांचे धनगर समाजाच्या चळवळीसाठी काडीचेही योगदान नाही. मात्र धनगर समाजाचे आयते नेतृत्व मिळावे म्हणून धडपड सुरू असल्याची टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

ढोणे म्हणाले, जेजुरी येथील पुतळा अनावरणाचा समारंभ हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण होता. जेजुरी आणि होळकर घराणे हे अतूट नाते आहे. अहिल्यादेवींनी जेजुरीच्या विकासात अनमोल असे योगदान दिलेले आहे. त्यामुळे गडावर अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा, अशी मागणी तीन वर्षांपूर्वी होळकरप्रेमींनी देव देवस्थान ट्रस्टकडे केली होती. पुतळ्याच्या अनावरणास ज्येष्ठ नेते शरद पवार, होळकर राजघराण्याचे युवराज यशवंतराव होळकर व करवीर घराण्याचे खासदार संभाजीराजे यांना निमंत्रित केले होते. पण तत्पूर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळास्थळी येऊन हुल्लडबाजी केली. शरद पवार यांच्याहस्ते अनावरणाला विरोध असल्याचे सांगत पुतळ्याच्या ठिकाणी हाणामारी केली. कार्यकर्त्यांना पुतळ्याच्या तिथे वर चढवून ओढाओढी केली. हा प्रकार पुतळ्याची विटंबना करण्याचा होता. त्यांनी नियोजनबद्धरित्या पुतळा अनावरण समारंभाला गालबोट लावले. पुतळ्याचे अनावरण कुणाच्याहस्ते घ्यावे, कधी घ्यावे हा ट्रस्टचा विषय असताना, पडळकरांनी भाजपच्या इशाऱ्यावरून काळिमा लावणारे कृत्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रेमासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या नावाने होणाऱ्या कार्यक्रमाची विटंबना केली आहे. भूषणसिंह यांना भाजपकडून आमदार, खासदारकी मिळवायची असल्याचा आरोपही ढोणे यांनी केला.