शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 20:00 IST

Politics chandrakant patil Kolhapur- महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा स्वत:हून कबुलीनामा दिला आहे, संवेदनशील मंत्री असल्याने ते राजीनामा देतील. त्यांनी दिला नाहीतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतला नाहीतर मग भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्दे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील यांची मागणी ठाकरे, शरद पवार यांनी राजीनामा घेतला नाहीतर भाजपचे राज्यभर आंदोलन

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात नुसते आरोप झाले तर मंत्री स्वत:हून राजीनामा देतात. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा स्वत:हून कबुलीनामा दिला आहे, संवेदनशील मंत्री असल्याने ते राजीनामा देतील. त्यांनी दिला नाहीतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा घ्यावा, त्यांनी घेतला नाहीतर मग भाजप राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. विधानसभेवेळी निवडणूक आयोगाला खोटी माहीती दिल्याने त्यांची निवडणूक रद्द होऊ शकते, असेही पाटील यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत झालेली तक्रारी आणि त्यांनी दिलेला कबुलीनामा, अशा प्रकारची कॅबीनेट मंत्र्यांच्या बाबतची घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडली आहे. संबंधित महिलेने अत्याचाराबाबत केलेल्या आरोपाची पोलीस शहानिशा करतील, त्यातून काय व्हायचे ते होईल. आरोप चुकीचे असतील तर त्या महिलेवर कारवाई होईल. मात्र तक्रार केलेल्या महिलेच्या बहिणीशी त्यांचे पंधरा वर्षे असलेले सबंध, त्यातून दोन मुले झाल्याची कबुली मुंडे यांनी दिली. हे सर्व नैतिकता आणि कायदा या दोन्हीच्या चौकटीत बसत नाही.पवार यांचे राजकारण शुध्दराष्ट्रवादीने मुंडेंचा राजीनामा घ्यायचा का त्यांना उठाबशा काढायला लावायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण शरद पवार यांनी ५० वर्षात एकाला बाजूला करून दुसऱ्याला घेतले, हा राजकारणाचा भाग सोडला तर शुध्द राजकारण केले. त्यामुळे ते निर्णय घेतील, असे पाटील यांनी सांगितले.जयंतराव, जनता तुम्हाला माफ करणार नाहीमुंडे यांच्यावरील आरोप अद्याप सिध्द झाले नसल्याने राजीनाम्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, केलेल्या गुन्ह्याची स्वत: कबुली दिल्यानंतर चौकशी कसली करता..? मित्र म्हणून माफी देणार असाल तर ठीक आहे, मात्र जनता तुम्हाला माफ करणार नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील