शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानने रस्त्यांसाठी निधी द्यावा, सर्वपक्षीय कृती समितीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:42 IST

मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.

ठळक मुद्देदेवस्थानने रस्त्यांसाठी निधी द्यावा, सर्वपक्षीय कृती समितीचे निवेदन

कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांत पडून बरेच अपघात झाले असून शहरातील नागरिक त्रस्त आहेत. कोल्हापुरात रोज पर्यटक येतात, त्यांनाही याचा त्रास होत आहे. हे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. मात्र त्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. तरी देवस्थान समितीने रस्त्यांसाठी निधी द्यावा.

यावेळी महेश जाधव यांनी या विषयावर देवस्थान समितीच्या बैठकीच सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच जिल्हाधिकारी व आयुक्तांचा सल्ला घेऊन, कायदेशीर बाबींचा विचार घेऊन त्याबाबतचा ठराव करू. त्यानंतर न्याय विधि खात्याकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, किशोर घाटगे, किसन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर