देवाळे वार्ताहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:21+5:302021-04-23T04:27:21+5:30

देवाळे ‌: दारूबंदीचा निर्धार केलेल्या पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील गावठी दारू तयार करून विकणाऱ्या गुत्तेवाल्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह ...

Devale Vartahar | देवाळे वार्ताहर

देवाळे वार्ताहर

Next

देवाळे ‌:

दारूबंदीचा निर्धार केलेल्या पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील गावठी दारू तयार करून विकणाऱ्या गुत्तेवाल्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातवे येथे प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या पार्श्वभूमीवर सातवेसह परिसरातील देशी दारू दुकाने गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत. सरकारमान्य दारू मिळत नसल्याचा फायदा उठवत गावातील एका खासगी दारू गुतेवाल्याची चंगळ झाली. गावातील व बाहेरून येणारे १५० पेक्षा अधिक तळीराम याचा लाभ घेऊ लागले होते. गुत्तेवाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सातवेसह परिसरात एकच खळबळ दारू पिणाऱ्या तळीरामात माजली आहे. गुत्तेवाल्याच्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालानंतर जवळच्या नातेवाईकांची देखील स्वॅब तपासणी चाचणी घेण्यात आली असून, आता गुत्तेवाल्याच्या संपर्कात आलेल्या सर्वच तळीरामांची तपासणी करावी, अशी मागणी वाढू लागल्याने दारू पिणारे तळीराम सैरभैर झाले आहेत.

Web Title: Devale Vartahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.