शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नियोजित शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी होत आहे. कॅन्सर, हाडाचे आजार, प्रसूती, अपघातामुळे रुग्ण वाढले असून आता हॉस्पिटलमधून रक्ताची मागणी होऊ लागली आहे. त्यात कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने सध्या सगळीकडे रक्ताची टंचाई भासत आहे. यासाठी आता रक्तदानाची गरज असून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कधी रक्तदान करावे

कोरोना प्रतिबंध लसीकरणानंतर चाैदा दिवसांनंतर

कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी

पुरुषांनी दर तीन महिन्याला

महिलांनी दर चार महिन्याला

शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्तदान

मानवी शरीरात (१८ ते ६५ वयोगटातील व ४५ किलोपेक्षा अधिक वजन) ५ ते ६ लिटर रक्त असते. त्यातील ५ टक्के म्हणजेच ३५० ते ४५० मिली रक्त एका वेळी घेतले आहे.

महिलांचे रक्तदानाचे प्रमाण ७ टक्के

रक्तदानाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर देशात ७ टक्केच महिला रक्तदान करतात. रक्तदानाची मानसिकता असते. मात्र, फास्ट फूडचे सेवन, सकस आहार व व्यायामाचा अभाव, अनियमित मासिक पाळीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी असते.

जिल्ह्यात २५० ‘थॅलेस्मिया’चे रुग्ण

‘थॅलेस्मिया’, ‘डायलेसिस’ रुग्णांना महिन्याला रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २५० हून अधिक ‘थॅलेस्मिया’चे रुग्ण असल्याने त्यांना मोफत रक्तपुरवठा करावा लागतो.

जून महिन्यात एक हजार प्लेटलेटची मागणी

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. त्यात ऊन-पावसामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले. जून महिन्यात जिल्ह्यात एक हजार प्लेटलेटची मागणी विविध रक्तपेढ्यांतून झाली.

कोट-

‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवले. सध्या रक्ताची टंचाई ओळखून राज्यभर रक्तदानाची मोहीम राबवण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.

- प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन)