शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शहर, जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनियाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:56 IST

CoronaVIrus In Kolhapur : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.

ठळक मुद्देशहर, जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनियाचा फैलाव आरोग्य प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन, शहरातही रुग्ण

कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.दोन महिन्यांपासून शहर, जिल्ह्यात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराने मृत होणाऱ्यांची संख्याही दोन अंकी आहे. अशातच डेंगी, चिकनगुनिया अशा साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. शुक्रवारी कळंबा येथे एका महिलेचा डेंगी सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनातही खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासन त्या महिलेचा नेमका कोणत्या आजाराने मृत्यू झाला, याचा शोध घेत आहे.सध्या कळंबा, उचगाव, पुलाची शिरोली, मुडशिंगी, कणेरी, सांगवडे, सांगवडेवाडी, शिरोळ, कागल येथे डेंगी आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्हा हिवताप विभागाचे अधिकारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती करीत आहेत. जास्त दिवस पाण्याची साठवणूक करू नये, घर आणि परिसरातील डासांची उत्पत्तीस्थान नष्ट करावेत, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानीचा वापर करावा, अशी जागृती केली जात आहे. पण जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी साठून राहण्याचे आणि दलदलीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गटारांचीही नियमित स्वच्छता न झाल्याने डास कमी होत नसल्याचे चित्र आहे.उपनगरातही सदरबाजार, जवाहरनगर, सुभाषनगर, जागृतीनगर, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी येथे डेंगी, चिकनगुनिया आजाराचा फैलाव गतीने होत आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यात आणि घराशेजारी असलेल्या दुचाकी, चारचाकीचे टायर, प्लॅस्टिक, पत्र्याच्या डब्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात डास तयार होत आहेत. यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढते आहे.

शहर, उपनगरे आणि जिल्ह्यातील काही गावांत डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने डासही वाढले आहेत. परिणामी साथीच्या आजाराचाही प्रसार होत आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. घर, परिसराची स्वच्छता राखावी. डासांपासून बचाव करून घ्यावा. डबक्यातील पाण्यात डास तयार होऊ नये, यासाठी गप्पी मासे सोडावेत.डॉ. विनोद मोरे,जिल्हा हिवताप अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर