शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसेसच्या अपघातात घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 14:02 IST

एस.टी महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसेस सुरुवातीला अपघाताचे प्रमाण वाढले होते. परंतु गेल्या दोन महिन्यात अपघातांच्या संख्येत घट आली असून, शिवशाही बस प्रवासासाठी अधिक सुरक्षित बनविण्याचा महामंडळाच्या प्रयत्न चांगले यश

ठळक मुद्देअपघांतच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश एस.टी प्रशासनाला दिले होतेयांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

कोल्हापूर : एस.टी महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसेस सुरुवातीला अपघाताचे प्रमाण वाढले होते. परंतु गेल्या दोन महिन्यात अपघातांच्या संख्येत घट आली असून, शिवशाही बस प्रवासासाठी अधिक सुरक्षित बनविण्याचा महामंडळाच्या प्रयत्न चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे.

वारंवार शिवशाही बसगाड्यांना होणारे अपघात प्रकारांची गांभीर्याने दखल घेत परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत अपघांतच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश एस.टी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करून उपाययोजना करण्यास सुरु केले. त्यानुसार पुणे येथील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत एस.टी महामंडळाच्या चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.अपघातमध्ये घट...गेल्या दोन महिन्यात शिवशाही बसेसच्या अपघातात घट झाली असून एप्रिल ते आॅगस्ट २०१८ दरम्यान दर एक लाख कि.मी मागे स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे अपघाताचे प्रमाण ०. ४१ टक्के होते ते सप्टेंबर २०१८ मध्ये ०.३४ टक्के व आॅक्टोबर मध्ये ०.१८ टक्के पर्यंत घटले आहे. तसेच खाजगी शिवशाही बसचे प्रमाण जे एप्रिल ते आॅगस्ट २०१८ दरम्यान दर एक लाख कि.मी मागे ०.३४ टक्के होते ते सप्टेंबर २०१८ मध्ये ०.२८ टक्के व आॅक्टोबर मध्ये ०.२१ टक्के पर्यंत घटले आहे. विशेष म्हणजे रा.प. महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या अपघाताचे वार्षिक प्रमाण दर एक लाख कि.मी. मागे ०.१८ टक्के इतके अत्यल्प आहे. त्यानुसार सध्या शिवशाही बसचे प्रमाण त्याहीपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ९९८ शिवशाही बसेस असून राज्यातील विविध २७८ मार्गावर दैनंदिन २१३० फेर्या करीत आहेत.१) बसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण२) चालकांचे विना अपघात बाबत समुपदेशन३) वाहनांची दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण४) घाट, रास्ता व वळणावर तज्ञ मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण.५) थेट बसेस बनविणाºया कंपनीच्या तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले. 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी