शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा निर्णय

By admin | Updated: December 11, 2015 00:51 IST

टोलचा प्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन; टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहेच; तर आता त्याबाबतचा अध्यादेश कधी काढणार, याची विचारणा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन संपताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय गुरुवारी येथे झालेल्या कोल्हापूर शहर, जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचाही निर्णय यावेळी झाला. भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. १ डिसेंबरपूर्वी हा टोल रद्द करून तसा अध्यादेश काढला जाईल, असे आधी सांगण्यात आले; परंतु ही मुदत पुन्हा एक महिन्याने वाढविली. सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, त्या अधिवेशनात तशी घोषणा करावी आणि अध्यादेश काढावा, अशी आठवण करून देण्यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे १६ डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. विधिमंडळ अधिवेशनात कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचे पडसाद त्यामध्ये उमटावेत, सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून पुन्हा एकदा आंदोलन हाती घ्यावे, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. यावेळी काहींनी पुन्हा एकदा ‘कोल्हापूर बंद’ करावे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूर प्रवेश बंद करावा, अशा संतप्त सूचना मांडल्या; परंतु एकदम टोकाची भूमिका न घेता संयमाने आंदोलन करू, असे ठरले. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम १६ डिसेंबर रोजी धरणे धरण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशन संपताच पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चाची तारीख १६ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)प्रकल्पाची किंमत वस्तुस्थितीवर ठरवारस्तेविकासाची किंमत ही भाजी मंडईतील मालासारखी घासाघीस करून न ठरविता तत्त्वावर तसेच वस्तुस्थितीवर निश्चित करावी, असे सांगतानाच ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यावेळी म्हणाले की, टोलमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले आहे; त्यामुळे आकडेवारीशी तसेच रकमेशी कृती समितीचा संबंध नाही. ३१ डिसेंबरपूर्वीची मुदत कशी पाळणार, हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. या बैठकीत कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप देसाई, अ‍ॅड. बाबा इंदूलकर, लालासाहेब गायकवाड, आदींची भाषणे झाली. जयकुमार शिंदे यांनी आभार मानले. बैठकीस दिलीप पवार, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अशोकराव साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.