लाकडी फळीवरून पडलेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST2021-02-07T04:23:45+5:302021-02-07T04:23:45+5:30

कोल्हापूर : हातकणंगले गावात नरंदे येथे शेतात ट्रॅक्टरमध्ये ऊस भरताना लाकडी फळीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड वृद्ध मजुराचा ...

The death of a cane laborer who fell from a wooden plank | लाकडी फळीवरून पडलेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू

लाकडी फळीवरून पडलेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू

कोल्हापूर : हातकणंगले गावात नरंदे येथे शेतात ट्रॅक्टरमध्ये ऊस भरताना लाकडी फळीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड वृद्ध मजुराचा शनिवारी मृत्यू झाला. सुभाबाई रामा काळे (वय ७२, सध्या रा. कुंभोज नरंदे रोड, हातकणंगले. मूळ गाव : पिंपळवाडी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे.

नरंदे गावात ऊस तोडणी मजुराचे तांडे आले आहेत. नरंदे गावात एका शेतात ऊस तोडून ती मोळी ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी सुभाबाई काळे या लाकडी फळीवर चढल्या. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने त्या मोळीसह खाली कोसळल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना मंगळवारी (दि.२) दुपारी घडली होती, त्यांच्यावर सीपीअर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: The death of a cane laborer who fell from a wooden plank