डाफळे, आबदार, वरुटे यांची ‘महाराष्ट्र केसरी’ साठी निवड

By Admin | Updated: December 17, 2014 00:15 IST2014-12-17T00:04:11+5:302014-12-17T00:15:54+5:30

कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणीचा निकाल

Daphale, Abadar, Varutse are selected for 'Maharashtra Kesari' | डाफळे, आबदार, वरुटे यांची ‘महाराष्ट्र केसरी’ साठी निवड

डाफळे, आबदार, वरुटे यांची ‘महाराष्ट्र केसरी’ साठी निवड


कोल्हापूर : मोतीबाग तालीम येथे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणीचा निकाल आज, मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ गटासाठी कौतुक डाफळे, नंदू आबदार, सचिन जामदार, महेश वरुटे यांची निवड करण्यात आली. ही निवड चाचणी ८ वजनी गटातून घेण्यात आली. यावेळी १५५ कुस्तीपटू सहभागी झाले होते. निकाल असा : ५७ किलो गटात : विकास पाटील (आमशी) विजयी विरुद्ध विक्रम मोरे (कोगे), नितीन पोवार (वाकरे) वि. वि. राणा नलवडे (नंदगाव), सद्दाम शेख (द. वडगाव) वि. वि. एकनाथ मोरबाळे (शिंदेवाडी), भरत पाटील (सोनगे) वि. वि. अविराज सुभेदार (शिरोली).६१ किलो गटात : सोनबा बोंगाणे (निगवे) वि. वि. सुनील पाटील (कोगे), माणिक कारंडे (सावर्डे) वि. वि. सर्वराज काशीद (राशिवडे), गजानन पाटील (केनवडे) वि. वि. संदीप जामदार (कोपार्डे), अक्षय डेळेकर (कुरुंदवाड) वि. वि. वैभव यादव (अर्जुनवाड).
६५ किलो गटात : मच्छिंद्र निउंगरे (साके) वि. वि. प्रवीण पाटील (चाफोडी), आकाश नलवडे (बाणगे) वि. वि. स्वप्निल पाटील (वाकरे), राम कांबळे (यळगूड) वि. वि. तानाजी कुराडे (नंदगाव), विशाल बाने (यवलूज) वि. वि. श्रीराम वाडकर (व्हनाळी).
७० किलो गटात : कुमार शेलार (कोतोली) वि. वि. भजनसिंग खोत (कोतोली), राकेश तांबोळकर (पाचाकटेवाडी) वि. वि. स्वप्निल देवडकर (अनुर), अनिल चव्हाण (नंदगाव) वि. वि. अतुल डावरे (बानगे), सागर पाटील (खुपिरे) वि. वि. पवन गावडे (कोथळी).
७४ किलो गटात : ऋषिकेश पाटील (राशिवडे) वि. वि. गणेश डेळेकर (कुरुंदवाड), अमित कारंडे (सावर्डे) वि. वि. नीलेश पवार (वाकरे), शहाजी हांडे (तळंदगे) वि. वि. प्रशांत येरुडकर (मुरगूड), रणजित नलवडे (बानगे) वि. वि. प्रवीण मांगोरे (मुरगूड).
८६ किलो गटात : समीर देसाई (गारगोटी) वि. वि. अभिजित भोसले (शितूर), संग्राम पाटील वि. वि. अनिरुद्ध पाटील (दोघेही आमशी), यासीन मुजावर (इचलकरंजी) वि. वि. वैभव पाटील (पाडळी), अरुण बोंगार्डे (बानगे) वि. वि. अनिकेत राऊत (पडळ).
९७ किलो गटात : संतोष लव्हटे (इचलकरंजी) वि. वि. धनाजी पाटील (देवठाणे), अजित पाटील (सावे) वि. वि. अतुल पाटील (महे), शुभम सिदनाळे (दत्तवाड) वि. वि. अतुल माने (वडणगे), रणजित आळवेकर (अर्जुनवाडा) वि. वि. कुमार पाटील (शिरुर).
महाराष्ट्र केसरी : कौतुक डाफळे (पिंपळगाव) वि. वि. संग्राम पाटील (देवठाणे), नंदू आबदार (तिटवे) वि. वि. उदयराज पाटील (अर्जुनवाड), सचिन जामदार (कोपार्डे) वि. वि. कपिल सनगर (तारळे), महेश वरुटे (कोल्हापूर) वि. वि. लक्ष्मण भिंगार्डे (नरेवाडी).
या स्पर्धेसाठी पंच म्हणून पी. जी. पाटील, चंद्रकांत चव्हाण, संभाजी पाटील, बबन चौगुले, बाबा शिरगावकर, दादा लव्हटे, प्रकाश खोत, तानाजी पाटील, संदीप पाटील, विलास पाटील, दादू चौगुले (ज्युनि.), भरत कळंत्रे यांनी काम पाहिले.

Web Title: Daphale, Abadar, Varutse are selected for 'Maharashtra Kesari'