शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारती ‘जैसे थे’च

By admin | Updated: June 1, 2015 00:13 IST

ना संख्या वाढली ना धोका टळला : इमारती उतरविण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक

कोल्हापूर : इतर शहरांतील धोकादायक इमारतींची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, कोल्हापुुरात गेल्या तीन वर्षांत ९०च्या आसपासच हा आकडा स्थिर आहे. मालक-कूळ वाद व न्यायालयातील प्रकरणात अडकलेल्या इमारतीवगळता इतर इमारती उतरण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नेमणूक केल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात जाहीर प्रकटीकरण व जनरल सर्व्हे करून शहरातील धोकादायक इमारती निवडल्या जातात. २०११-१२ मध्ये या सर्व्हेतून ६४ तर २०१२-१३ मध्ये ६९ तर २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये ९० इमारती धोकादायक ठरल्या. या इमारतमालकांना व रहिवाशांना इमारत पाडा किंवा दुरुस्ती करून नवा स्ट्रक्चर आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने केलेल्या या सर्व्हेत शिवाजी पेठ, ताराबाई रोड, महाद्वार रोड, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, कसबा बावडा येथील ९० इमारती धोकादायक आहेत. गांधी मैदान विभागीय कार्यालय - १८, शिवाजी मार्केट - ३९, राजारामपुरी - २६, ताराराणी मार्केट - ७ अशा विभागवार ९० इमारती धोकादायक ठरविल्या आहेत. इमारत मालकांनी तत्काळ रिस्ट्रक्चर आराखडा सादर करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.शहरातील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. वादातील इमारती वगळता जीवितास धोकादायक ठरणाऱ्या इमारती उतरविण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे. नोटीस पोहोचलेल्या मिळकतधारकांनी तत्काळ रिस्ट्रक्चर आॅडिट करून घ्यावे. - नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता, महापालिका)३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचा सर्व्हेमध्ये ७५ टक्के घरगुती वापराच्या इमारती पूर्णत्वाचा दाखला घेत नाहीत. शहरातील १ लाख १५ मिळक तींची पूर्ण माहिती महापालिकेने जमा करण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक इमारतींना फक्त नोटिसीच दिली जाते, प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप बांधकाम विभागावर होत आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षी महापालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. ५० रुपये प्रति चौरस फुटांप्रमाणे पाडलेल्या इमारतींची आकारणी केली जाणार आहे. हे पैसे संबंधित मिळकतधारकांकडून घरफाळ्यातून वसूल केले जाणार आहेत.