दालमिया कामगार संघटना कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:22 IST2021-04-16T04:22:48+5:302021-04-16T04:22:48+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : वारणा साखर कारखाना संघ मान्यताप्राप्त इंटक प्रणित आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कामगार ...

Dalmiya trade union executive | दालमिया कामगार संघटना कार्यकारिणी

दालमिया कामगार संघटना कार्यकारिणी

पोर्ले तर्फ ठाणे : वारणा साखर कारखाना संघ मान्यताप्राप्त इंटक प्रणित आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कामगार संघटनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. संघटनेतील सदस्य सेवानिवृत्त झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या ११ जागांपैकी सात जागी नवनिर्वाचित सदस्यांना संधी देण्यात आली.

निवड झालेल्या कार्यकारिणीच्या यादीचे पत्र दालमिया प्रशासनाला वारणा कामगार संघटनेकडून देण्यात आले. ही निवड जनसुराज्य पक्षप्रमुख आमदार डाॅ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

८० गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यात पाच गट कार्यक्षेत्रातील कामगारांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्य असे : विलास शिंदे (आसुर्ले), एम. एम. पाटील, प्रकाश चौगुले (पोर्ले तर्फ ठाणे), युवराज बेलेकर (कळे), शिवाजी शेलार (निगवे दुमाला), सचिन सांवत (बांबरवाडी), जोतीराम शेळके (सातार्ड), शिवाजी आडनाईक (यवलूज), मोहन उत्रेकर (केर्ली), नामदेव खोत (निकमवाडी), हिंदुराव पाटील (कोलोली).

Web Title: Dalmiya trade union executive